
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Men's ODI Player of the Year : कोण असेल यंदाचा सर्वश्रेष्ठ वनडे क्रिकेटर? 'या' चार खेळाडूंमध्ये चुरशीची टक्कर
ICC Men's ODI Player of the Year : आयसीसीने यंदाची तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या पुरस्कारासाठीची नामाकंनं जाहीर केली आहेत. नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधील नामांकनंही जाहीर केली आहेत.
ICC Men's ODI Player of the Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 सालच्या सर्वश्रेष्ठ एकदिवसीय क्रिकेटरांची नामांकनं जाहीर केली आहेत. आयसीसीच्या या मानाच्या पुरस्काराला मिळवण्याासाठी चार खेळाडूंमध्ये चुरशीची टक्कर आहे. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam), बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan), आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (Paul Sterling) आणि दक्षिण आफ्रीकाचा जनेमन मलान (Janneman Malan) यांची नावं सामिल आहेत.
शाकिब अल हसन याने यावर्षी 9 सामन्यात 39.57 च्या सरासरीने 277 रन केले. शिवाय 17.52 च्या सरासरीने 17 विकेटही पटकावले. शाकिबने यावर्षी जवळपास सर्वच सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. त्याने जानेवारीमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध शानदार प्रदर्शन केलं करत प्लेअर ऑफ द सीरीजचा पुरस्कारही मिळवला होता.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने वर्षभरात दमदार क्रिकेटचं दर्शन घडवलं. त्यात केवळ 6 वनडे सामने खेळूनही त्याने यात 228 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला. बाबरच्या प्रदर्शनामुळे पाकिस्तानने 2-1 ने मालिका जिंकली.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या जनेमन मलान याने यावर्षी 8 सामन्यात 84.33 च्या सरासरीने 509 रन केले. यावेळी त्याने दोन अर्धशतकं आणि दोन शतकं झळकावली आहेत.
या यादीत शेवटचं नाव असणारा आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग याने 14 सामन्यात 79.66 च्या सरासरीने 705 रन केले आहेत. स्टर्लिंगने अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यात आयर्लंडकडून सर्वाधिक रन केले. यावेळी त्याने दोन शतकं ठोकली आहेत.
हे देखील वाचा-
- ICC T20I Player of Year: आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयरची नामांकनं जाहीर, मोहम्मद रिझवानसह तिघांची नावं
- Ind vs SA, 1st Test : पहिल्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय, 113 धावांनी सामना जिंकत मालिकेतही 1-0 ची आघाडी
- IND vs SA 1st Test: तिसऱ्या दिवशीच्या पंतच्या खेळीवर विनोद कांबळीनी उपस्थित केले प्रश्न, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
