"सूर्यकुमार पाकिस्तानात असता तर..."; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या वक्तव्यानं सर्वच चकीत
Salman Butt on Suryakumar Yadav: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्या नावाचं वादळ मैदानात उतरलं आणि त्यानं सर्वांनाच चकित केलं. एवढंच नाहीतर सूर्याच्या खेळीची पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटनही दखल घेतली.
Salman Butt on Suryakumar Yadav, Team India: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) सध्या क्रिडाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. सूर्यकुमार यादवसारखा कोणताही फलंदाज टी-20 फॉरमॅटमध्ये नाही, त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याची चर्चा आहे. पाकिस्तानचा (Pakistan National Cricket Team) माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) यानं सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे. तसेच, सूर्यकुमार यादव जर पाकिस्तानात असता तर काय झालं असतं, हेसुद्धा त्यानं सांगितलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवनं केवळ 51 चेंडूत 112 धावांची खेळी केली. सूर्याचे हे टी-20 फॉरमॅटमधील तिसरं शतक होतं. या खेळीनंतर सर्वच स्तरातून सूर्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, आता पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटनंही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, जर सूर्यकुमार यादव पाकिस्तानात असता, तर तो राष्ट्रीय संघात पोहोचूच शकला नसता, असंही सलमान म्हणालाय. याचं कारण सांगताना सलमान म्हणाला की, आमच्या देशातील धोरणं काहीशी वेगळी असल्यामुळे सूर्यकुमारला राष्ट्रीय संघात खेळणं शक्यच झालं नसल्याचं त्यानं म्हटलं आहे.
सलमान बटनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, मी एकेठिकाणी वाचलं होतं की, सुर्यानं वयाच्या 30 व्या वर्षी पदार्पण केलं, तेव्हा माझ्या मनात विचार आला, तो किती भाग्यवान आहे की, तो भारतीय आहे. कारण तो पाकिस्तानात असता तर त्याला या वयात खेळण्याची, पदार्पणाची संधीच मिळाली नसती. कारण आमच्या देशात 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना संघात पदार्पण करण्याची परवानगीच दिली जात नाही.
सलमानं पुढे बोलताना सांगितलं की, "सध्या जे संघात खेळातयत त्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र, वयाच्या तिशीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करणं मोठं आव्हानच आहे. सूर्यकुमारचा फिटनेस आणि माइंडनेस अप्रतिम आहे. तो प्रत्येक गोलंदाजाला, त्याच्या रणनितीला आधीच ओळखतो."
दरम्यान, सूर्यकुमार यादवने वयाच्या 30 व्या वर्षी 2021 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून धमाकेदार कामगिरी केल्यामुळे सूर्यकुमार यादवला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं. सन 2022 मध्ये, सूर्यकुमार यादव T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Suryakumar Yadav, Team India: "तुम्ही सूर्यकुमारवर जास्त..."; माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाला इशारा