India vs Pakistan War PSL: पाकिस्तानात टॉम करन, डॅरेल मिचेलची भयभीत करणारी कहाणी, भारताच्या हवाई हल्ल्यावेळी नागरी विमानांमध्ये परदेशी क्रिकेटर्सना बसवलं?
India vs Pakistan War PSL: भारतविरुद्धच्या युद्धादरम्यान पाकिस्तानमध्ये अनेक परदेशी खेळाडूंना असुरक्षित वाटू लागल्याने पीएसएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला.

India vs Pakistan War PSL: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यात 5 ते 6 दिवस तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. या तणावादरम्यान भारतात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL) खेळवण्यात येत होती. मात्र दोन्ही देशांमधील तणाव पाहता आणि विविध ठिकाणी होणारे ड्रोन हल्ले पाहता पीएसएल आणि आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी पीएसएल स्पर्धेसाठी विदेश खेळाडू पाकिस्तानात आले होते. मात्र भारतविरुद्धच्या युद्धादरम्यान पाकिस्तानमध्ये अनेक परदेशी खेळाडूंना असुरक्षित वाटू लागल्याने पीएसएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला.
सॅम बिलिंग्स, डॅरिल मिशेल, कुसल परेरा, डेव्हिड वीस आणि टॉम करनसह सर्व खेळाडू खूप घाबरले होते. दुबईत उतरल्यानंतर, डॅरिल मिशेलनं मला सांगितलं की, तो पुन्हा कधीही पाकिस्तानला जाणार नाही, विशेषतः अशा संकटाच्या काळात तर नाहीच नाही, मग काहीही होऊ देत, असं सॅम बिलिंग्स म्हणाला. तसेच इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करनला अश्रू अनावर झाले. टॉम करनला पाकिस्तानातील विमानतळ बंद करण्यात आलंय, हे समजलं...त्यावेळी तो ढसाढसा रडू लागला. टॉम करन लहान मुलासारखा रडू लागला आणि त्याला शांत करण्यासाठी दोघा-तिघांची गरज लागली, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये भारताकडून ज्यावेळी पाकिस्तानवर हवाई हल्ल्यावेळी नागरी विमानांमध्ये परदेशी क्रिकेटर्सना बसवल्याचा दावा केला जातोय.
भारताच्या हवाई हल्ल्यावेळी नागरी विमानांमध्ये परदेशी क्रिकेटर्सना बसवलं?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टॉम करन का रडत होता?, तसेच डॅरिल मिशेल का संतापला होता?, याबाबत दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे जीव धोक्यात घातला होता. कोणतीही व्यावसायिक विमान चालवण्यास बंदी घातल्यानंतरही पाकिस्तानकडून ते चालवण्यात येत होते. पाकिस्तानची ही नापाक हरकत होती. या विमानात परदेशी खेळाडूंना बसवण्यात आले होते, असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
LISTEN How Pakistan Army DELIBERATELY put International Cricketers Life at Risk So much so that Tom Curran cried & Daryl Mitchell swore never to come back to Pakistan ever again pic.twitter.com/AXplxzWMN4
— Rosy (@rose_k01) May 17, 2025
आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार-
आठ दिवसांच्या विरामानंतर आयपीएल 2025 च्या थरारक उत्तरार्धाला आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 3 जून रोजी होईल. नवीन वेळापत्रकानुसार, प्लेऑफ टप्पा 29 मे पासून सुरू होईल. पहिला क्वालिफायर सामना 29 मे रोजी खेळवला जाईल. एलिमिनेटर सामना 30 मे रोजी, दुसरा क्वालिफायर सामना 1 जून रोजी आणि अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. प्लेऑफ सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर केली जातील.





















