Rehan Ahmed: रेहान अहमदचं धमाकेदार पदार्पण; पाच विकेट्स घेऊन रचला इतिहास, भल्याभल्यांना दाखवला बाहेरचा रस्ता!
PAK vs ENG 3rd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात कराचीच्या (Karachi) नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला गेला.
PAK vs ENG 3rd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात कराचीच्या (Karachi) नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं 8 विकेट्सनं विजय मिळवत पाकस्तानच्या संघाला मोठा धक्का दिला. या मालिकेत पाकिस्तानच्या संघाला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानच्या संघाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीय.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानच्या संघानं पहिल्यांदाच घरच्या मैदानावर पहिल्यात क्लीन मिळवलाय. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवाला इंग्लंडचा युवा गोलंदाज रेहान अहमद (Rehan Ahmed) कारणीभूत ठरला. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजाच्या नाकी नऊ आणले. तसेच या सामन्यात त्यानं पाच विकेट्स घेऊन खास विक्रमाला गवसणी घातलीय.
ट्वीट-
Just getting started 🌟
— England Cricket (@englandcricket) December 19, 2022
🇵🇰 #PAKvENG 🏴 pic.twitter.com/9jEy6WZcmp
रेहान अहमदची भेदक गोलंदाजी
रेहान अहमदनं वयाच्या 18 वर्ष 126 व्या दिवशी म्हणजेच पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रेहान अहमदच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानला अवघ्या 167 धावांवर रोखलं. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात रेहान अहमदनं बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, अघा सलमान आणि मोहम्मद वसीमला आपल्या जाळ्यात अडकवून इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारे युवा गोलंदाज
रेहान अहमदनं आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह तो कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेटस् घेणारा सहावा युवा गोलंदाज ठरला. याबाबतीत पाकिस्तानचा उल घानी अव्वल स्थानावर आहे. त्यानं 1958 साली पाकिस्तानसाठी पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याचं वय 16 वर्ष 303 दिवस इतकं होतं. त्यानंतर पाकिस्तानचा नसीम शाहनं वयाच्या 16 वर्ष 307 दिवसात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मोहम्मद आमिर (17 वर्ष 257 दिवस) तिसऱ्या क्रमांकावर, इनामूल हक जूनिअर (18 वर्ष 46 दिवस) चौथ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंडचा डेनियल विटोरी (18 वर्ष 126 दिवस) पाचव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-