PAK vs ENG: इंग्लंड-पाकिस्तान तिसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज सामन्याला मुकणार
England tour of Pakistan: मुल्तानमध्ये (Multan) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (Pakistan vs England) पराभव करून मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे.
PAK vs ENG Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना कराची येथे 17 ते 21 डिसेंबर असा खेळवला जाणार आहे. पण या सामन्या पूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या कसोटीत तो नव्हता पण तिसऱ्या कसोटीत खेळेल असे वाटत होते, पण दुखापतामुळेतो तिसऱ्या कसोटीला ही मुकणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील या कसोटी मालिकेतील पाकिस्तानच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. खेळाडूंच्या दुखापतीमुळे पाकिस्तान संघाच्या चिंता वाढत आहेत. आधी हॅरीस रौफ स्पर्धेबाहेर झाल्यावर आता तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नसीम शाह बाहेर पडल्याने पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नसीम दुखापतीतून सावरण्यासाठी लाहोरच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच नसीमला खांद्यावर क्षेत्ररक्षण करताना त्रास झाला होता. या दुखापतीमुळे नसीम दुसऱ्या कसोटी सामन्यापासूनही दूर राहिला.
मालिकेत पाकिस्तानची 2-0 ची विजयी आघाडी
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघाने शानदार कामगिरी करत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाने पाकिस्तानला दोन्ही सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही आणि या मालिकेतील दोन्ही सामने जिंकले. आता तिसर्या कसोटी सामन्यात एकीकडे इंग्लंड पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानात क्लीन स्वीप करून इतिहास रचण्याच्या इराद्याने उतरेल, तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकून व्हाईट वॉश मिळण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडनं मालिकेतील पहिला सामना 74 धावांनी तर दुसरा 26 धावांनी जिंकला. यावेळी रावळपिंडी स्टेडियममध्ये (Rawalpindi Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. पण अखेरीस ओली रॉबिन्स आणि अँडरसनच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. हा सामना इंग्लंडच्या संघानं 74 धावांनी जिंकत तीन सामना जिंकला. मग दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात 79 धावांची आघाडी मिळविल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 275 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला 355 धावांचं लक्ष्य मिळालं. जे पाकिस्तानचे खेळाडू पूर्ण करु शकले नाही आणि 328 धावांवर सर्वबाद झाले. ज्यामुळे सामना इंग्लडनं26 धावांनी जिंकला.
हे देखील वाचा-