एक्स्प्लोर

PAK vs CAN : सलग दोन पराभवानंतर सूर गवसला, पाकिस्तानचा कॅनडावर 7 विकेटनं विजय

PAK vs CAN :भारत आणि अमेरिकेविरुद्ध पराभव पत्कारल्यानंतर आज पाकिस्तानचा संघ आणि कॅनडा आमने सामने आले होते. या मॅचमध्ये कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 106 धावा केल्या होत्या.

PAK vs CAN न्यूयॉर्क : भारत आणि अमेरिकेकडून पराभव स्वीकारल्यानंतर अखेर पाकिस्तानला सूर गवसला आहे. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅनडाला बाबर आझमनं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कॅनडाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 106 धावांवर रोखलं. कॅनडाकडून अरोन जॉन्सननं 44 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली. त्यामुळं त्यांनी 106 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्ताननं मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमच्या फलंदाजीमुळं कॅनडानं दिलेलं आव्हान पार केलं. 

कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 106 धावा केल्या. कॅनडाकडून अरोन जॉन्सननं 4 चौकार आणि 4 षटकार मारत 52 धावांची खेळी केली. दुसरीकडे कॅनडाचा संघ विकेट गमावत होता. कॅनडाच्या 9 पैकी 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजांनी 7 पेक्षा कमी इकोनॉमीनं धावा दिल्या. मोहम्मद अमीर आणि हॅरिस राऊफनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  

कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानपुढं विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांची भागिदारी महत्त्वाची ठरली. बाबर आझम 33 धावांवर बाद झाला. मोहम्मद रिझवाननं 53 धावा केल्या. मोहम्मद रिझवाननं नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. अखेर पाकिस्ताननं टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय मिळवला आहे. 

पाकिस्तान अ गटात कितव्या स्थानावर 

यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटात 5 संघ या प्रमाणं चार गट करण्यात आले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा  आणि आयरलँड या संघांचा समावेश आहे.  भारतानं पाकिस्तान आणि आयरलँडला पराभूत केल्यानं चांगल्या नेट रनरेटसह ते पहिल्या स्थानावर आहेत. अ गटात अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पाकिस्ताननं आज पहिला विजय मिळवला. पाकिस्ताननं कॅनडाला 7 विकेटनं पराभूत केलं. कॅनडानं देखील आयरलँडला पराभूत करत एक विजय मिळवलेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडे देखील पाकिस्तान प्रमाणं 2 गुण आहेत. मात्र, नेट रनरेट चांगलं असल्यानं पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. तर, कॅनडा अ गटात चौथ्या स्थानावर आहे. आयरलँड पाचव्या स्थानावर आहे. 

दरम्यान, चार गटातून प्रत्येकी दोन संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहेत. सुपर-8 मध्ये प्रवेश करणारे दोन संघ प्रत्येक गटातील पहिले दोन संघ असतील. पाकिस्तानला सुपर-8 मध्ये प्रवेश करायचा असल्यास अमेरिकेनं उर्वरित मॅचमध्ये पराभूत व्हावं लागेल आणि भारताला सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. 

संबंधित बातम्या : 

T20 World Cup 2024 कामरान अकमलने शीख धर्मावर केलं वादग्रस्त विधान; हरभजन सिंग संतापला, तुला लाज वाटली पाहिजे...

T20 World Cup 2024 Ind vs Pak: ओके...आता 30 मिनिटांनी भेटू; मुलाखतीत जसप्रीत बुमराहचं उत्तर, पत्नी संजनानेही घेतली फिरकी

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR Live Update : जेव्हा सर्व आशा संपल्या, तेव्हा तो एकटाच लढला! कोलकात्याचा खरा 'संकटमोचक' कॅमरून ग्रीन, संपूर्ण 'गेम'च पलटला
GT vs KKR Live Score IPL 2026 : जेव्हा सर्व आशा संपल्या, तेव्हा तो एकटाच लढला! कोलकात्याचा खरा 'संकटमोचक' कॅमरून ग्रीन, संपूर्ण 'गेम'च पलटला
Mumbai Indians IPL 2026 : रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
Romi Bhinder Fined IPL 2026 : डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण
डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण
Mumbai Indians Playoffs Scenario IPL 2026 : पाचवेळा चॅम्पियन, पण आता मिशन इम्पॉसिबल...; प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर एकच अट, जाणून घ्या समीकरण
पाचवेळा चॅम्पियन, पण आता मिशन इम्पॉसिबल...; प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर एकच अट, जाणून घ्या समीकरण

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Embed widget