(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Varinder Singh Passes Away: ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंह यांचं निधन
Varinder Singh Passes Away: ऑलिम्पिक आणि विश्वचषक पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा भाग असलेल्या वरिंदर सिंहचे मंगळवारी सकाळी जालंधरमध्ये निधन झालंय.
Varinder Singh Passes Away: ऑलिम्पिक आणि विश्वचषक पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा भाग असलेल्या वरिंदर सिंह यांचे आज (मंगळवारी, 28 जून) सकाळी जालंधरमध्ये निधन झालंय. 1970 च्या दशकात भारताच्या अनेक संस्मरणीय विजयांचा एक भाग असलेला वरिंदर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1975 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे वरिंदर सिंह भाग होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचं आतापर्यंतचं हे एकमेव सुवर्णपदक आहे. त्यावेळी भारतानं अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला होता.
वरिंदर सिंह यांची कामगिरी
1972 म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि अॅमस्टरडॅममध्ये 1973 विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात वरिंदरचा सहभागी होते. वरिंदर संघात असताना भारतानं 1974 आणि 1978 आशियाई क्रीडा स्पर्धेतही रौप्यपदक जिंकलं होतं. 1975 च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिकमध्येही त्यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
भारतीय हॉकी संघाचं ट्वीट-
वरिंदर यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार
वरिंदरला 2007 मध्ये प्रतिष्ठित ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. भारतीय हॉकी संघानं वरिंदरच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतीय हॉकी संघानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली आहे. ज्यात असं म्हटलंय की, "वरिंदर सिंह यांचं यश जगभरातील हॉकी समुदाय स्मरणात ठेवतील." सध्या सोशल मीडियावर वरिंदर सिंह यांना श्रद्धांजली वाहली जात आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs IND: बर्घिंगहॅम कसोटीत भारतासमोर मोठं आव्हान, मास्टर प्लॅनसह इंग्लंडचा संघ उतरणार मैदानात
- IND vs ENG: इंग्लंडमध्ये पाच भारतीय गोलंदाजांनी दाखवली जादू, ईशान शर्मा यादीत अव्वल
- Arjun Tendulkar: जिनं विराटला प्रपोज केलं, आता त्याच महिला क्रिकेटरसोबत फिरतोय अर्जून तेंडूलकर!
- IRE vs IND: अख्ख्या भारतीय संघाशी एकटाच भिडलेल्या हॅरी टेक्टर आहे तरी कोण?