Test Cricket : कसोटीत एका दिवसात 600 धावा करणार, इंग्लंडच्या स्टार खेळाडूचा दावा, क्रिकेट विश्वात खळबळ
Ollie Pope Statement: इंग्लंडचा स्टार खेळाडू ओली पोप यानं मोठा दावा केला आहे. कसोटी मॅचमध्ये एका दिवसात 600 धावा करुन दाखवणार असल्याची भविष्यवाणी त्यानं केली आहे.
लंडन : इंग्लंडचा (England) स्टार फलंदाज ओली पोप यानं कसोटी क्रिकेट संदर्भात मोठं वक्तव्य करुन क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडची टीम कसोटी मॅचमध्ये एका दिवसात 600 धावांचा टप्पा पार करेल, असा दावा ओली पोप (Ollie Pope) यानं केला आहे. ओली पोपच्या या दाव्यामुळं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. इंग्लंडची क्रिकेट टीम बॅजबॉल क्रिकेट खेळणं सोडून देणार असल्याबाबत करण्यात येणारे दावे देखील ओली पोपनं फेटाळून लावले आहेत.
ओली पोपनं इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात 600 धावा करणार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे टेस्ट क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडनी ही कामगिरी बॅजबॉल क्रिकेट खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वीची आहे. इंग्लंडनं तब्बल 90 वर्षांपूर्वी 1936 मध्ये कसोटी सामन्यात एका दिवसात 588 धावा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
90 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडणार
बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वात इंग्लंडची टीम 90 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड मोडेल असा विश्वास ओली पोपला आहे. ओली पोपनं बीबीसी स्पोर्ट्स सोबत बोलतान याबाबत भाष्य केलं. तो म्हणाला "कधी कधी आम्ही एका दिवसात 280 ते 300 धावा करु शकतो, कारण आम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतो.मात्र, भविष्यात असा एक दिवस येईल तेव्हा आम्ही एका दिवसात 500 ते 600 धावा करु, तो चांगला विक्रम असेल".
इंग्लंडनं डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात रावळपिंडीत झालेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 506 धावा केल्या होत्या. पोपनं बॅजबॉल रणनीतीसंदर्भात देखील भष्य केलं. ट्रेंट ब्रिजमध्ये पहिल्या दिवशी विचारलं गेलं होत की तुम्हाला असं खेळण्यासाठी सांगितलं जातं का? यावर ओली पोप म्हणाला आमची कसोटी खेळण्याची नैसर्गिक पद्धत तिचं आहे.
इंग्लंडनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. पहिली कसोटी इंग्लंडनं एका डावानं जिंकली होती तर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडनं 241 धावांनी विजय मिळवला होता.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंड सध्या सहाव्या स्थानावर आहे. भारत या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये अंतिम लढत होईल.
संबंधित बातम्या :