NZ (W) Vs IND (W) 4th ODI: चौथ्या एकदिवसीय सामन्यातही भारताची निराशाजनक कामगिरी, न्यूझीलंडचा 63 धावांनी विजय
NZ W Vs IND W: पावसामुळं हा सामना 20 षटकाचा खेळवण्यात आला.
NZ W Vs IND W: न्यूझीलंडविरुद्ध क्वीन्सटाउनच्या (Queenstown) जॉन डेव्हिस ओव्हल मैदानात (John Davies Oval) खेळण्यात आलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 63 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं हा सामना 20 षटकाचा खेळवण्यात आला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं भारतासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. भारताचा संघ 18 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर 128 धावांवर असताना ऑलआऊट झाला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडचे सलामीवीर सोफी डेव्हाईन आणि सुझी बेट्सनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेट्स साठी या दोघांत 24 बॉलमध्ये 32 धावा केल्या. त्यानंतर सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला पहिला विकेट्स मिळाला. रेणुका सिंहच्या गोलंदाजीवर कर्णधार सोफी डेव्हाईन आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मैदानात आलेल्या अमेलिया केर आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. राजेश्वरी गायकवाडच्या गायकवाडच्या गोलंदाजीवर बेट्सनं तिचा विकेट्स गमवाला. त्यानंतर एमी सॅटरथवेट सोबत अमेलिया केरनं संघाचा डाव पुढे चालवला. परंतु, 19 व्या षटकात सॅटरथवेटनं (32 धावा) मेघना सिंहच्या गोलंदाजीवर बाद झाली. दरम्यान, अखेरच्या षटकात अमेलिया केरनं आक्रमक फलंदाजी करत संघाचा स्कोर 191 धावापर्यंत पोहचवला. भारताकडून रेणुका सिंहनं सर्वाधिक दोन विकेट्स मिळवल्या. तर, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
न्यूझीलंडकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झालीय. सलामीवीर शेफाली वर्मा (0 धावा) आणि स्मृती मानधना (13 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर यस्तिका भाटिया हिलाही बेट्सनं शून्यावर बाद केलं. दरम्यान, पूजा वस्त्राकरलाही चांगली फलंदाजी करता आली नाही. तिनंही 4 धावांवर असताना आपली विकेट्स गमावली. भारताकडून रिचा घोषनं सर्वाधिक 52 धावा केल्या आणि कर्णधार मिताली राजनं 30 धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
हे देखील वाचा-
- Wriddhiman Saha : वृद्धिमानला मिळालेल्या धमकीवर BCCI चं हस्तक्षेप, लेखी तक्रारीवर होणार कायदेशीर कारवाई?
- IND vs WI : वेंकटेश अय्यरची टीम इंडियात स्थान पक्कं? कोच राहुल द्रविड म्हणतो...
- Indian Women Cricket Team: भारतानं गेल्या 12 महिन्यात 4 एकदिवसीय मालिका गमावल्या, उद्या न्यूझीलंडविरुद्ध चौथा सामना खेळणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha