एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ओमरझाईनं हिशोब पूर्ण केला, बाऊंड्रीवरुन थेट थ्रो अन् निकोलस पूरन रनआऊट, शतकाच्या स्वप्नांवर पाणी फेरलं

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये निकोलस पूरननं सर्वाधिक धावा केल्या. निकोलस पूरन 98 धावांवर धावबाद झाला. आझमतुल्लाह ओमरझाईनं त्याला धावबाद केलं.

सेंट ल्यूसिया : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजमधील शेवटची मॅच सुरु आहे. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. वेस्ट इंडिजनं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली. यामध्ये निकोलस पूरनच्या 98 धावा महत्त्वाच्या ठरल्या. निकोलस पूरनला यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील पहिलं शतक झळकावण्याची संधी हुकली. आझमतुल्लाह ओमरझाईनं बाऊंड्रीवरुन टाकलेल्या थ्रोमुळं निकोलस पूरन धावबाद झाला अन् त्याचं शतकाचं स्वप्न हुकलं. 

निकोलस पूरन, जे. चार्ल्स, शाई होप आणि रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 5 विकेटवर 218 धावा केल्या. वेस्ट इंडिजनं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. निकोलस पूरन यानं 53 बॉलमध्ये 6 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 98 धावा केल्या. निकोलस पूरन  97 धावांवर खेळत असताना त्यानं अखेरच्या ओव्हरमध्ये दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या आझमतुल्लाह ओमरझाईनं टाकलेला थ्रो थेट स्टम्परवर आदळला.ओमरझाईच्या थ्रोमुळं निकोलस पूरन धावबाद झाला. यामुळं निकोलस पूरनचं शतकाचं स्वप्न हुकलं. तो 98 धावांवर बाद झाला. निकोलस पूरननं 98 धावा केल्या तर जे चार्ल्सनं 43 धावा केल्या. शाई होपनं 25 धावा केल्या आहेत. रोव्हमॅन पॉवेलनं 26 धावा केल्या.

ओमरझाईनं दिलेल्या 36 धावा

राशिद खाननं आझमतुल्लाह ओमरझाईला डावाची चौथी ओव्हर दिली होती. या ओव्हरमध्ये निकोलस पूरन फलंदाजी करत होता. आझमतुल्लाह ओमरझाईनं या ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या. निकोलस पूरननं तीन षटकार आणि दोन चौकार मारत 26 धावा काढल्या होत्या. ओमरझाईनं त्या ओव्हरमध्ये नो आणि वाईड बॉल देखील टाकले होते.

अफगानिस्तानची टीम 

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, गुलबदीन नैब, आझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, राशिद खान (कॅप्टन), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी  

वेस्टइंडिजची टीम 

ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेड मॅक्कॉय

दरम्यान, अफगाणिस्तान विरुद्ध  वेस्ट इंडिज यांच्यातील मॅचमध्ये कोणीही जिंकलं तरी त्याचा परिणाम सुपर 8 मधील लढतींवर होणार नाही. 

संबंधित बातम्या :

Suryakumar Yadav : सुपर 8 पूर्वी रोहित शर्मासह भारताची चिंता वाढवणारी अपडेट, सूर्यकुमार यादवला दुखापत

Fastest T20 Hundred: 27 चेंडूत झळकावले शतक, 18 षटकार अन् 6 चौकारांचा पाऊस; ख्रिस गेलचा मोडला विक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गंभीर प्रकरणात पुणे कोर्टाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर Superfast News ABPमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Embed widget