एक्स्प्लोर

VIDEO : नवविवाहित अक्षर पटेलही पत्नीसह महाकाल देवाच्या दर्शनाला, विधीवत पूजा करतानाचा व्हिडीओ आला समोर  

Axar Patel Meha Patel : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेल काही दिवसांपूर्वीच मेहा पटेलसोबत लग्नबंधनात अडकला. ज्यानंतर आता त्याने पत्नीसोबत देवदर्शनाला पोहोचला आहे.

Axar Patel : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलनंतर (KL Rahul) आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही (Axar Patel) उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. अक्षर आपल्या पत्नीसह महाकालच्या दरबारात पोहोचला असून तिथे त्याने भस्म आरतीमध्येही भाग घेतला. अक्षर हा काही दिवसांपूर्वीच त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्नबंधनात अडकला. ज्यानंतर आता तो देवदर्शन करताना दिसला आहे. दरम्यान आता अक्षर पटेल महाकालच्या दरबारात पूजा करतानाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अक्षर पटेलने यावेळी सांगितले की, तो 5 वर्षांपूर्वी भगवान महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला पोहोचला होता, पण भस्म आरती पाहू शकला नाही. तेव्हापासून त्याला भस्म आरती पाहण्याची इच्छा होती. आज त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. अक्षर आणि त्याची पत्नी मेहा या भस्म आरतीत सहभागी झाल्यानंतर खूप आनंदी आणि समाधानी दिसत होते.

पाहा VIDEO-

केएल राहुलनेही भगवान महाकालचे आशीर्वाद घेतले

अक्षरआधी रविवारी क्रिकेटर केएल राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत भगवान महाकाल देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला होता. भस्म आरतीमध्येही ते सहभागी झाले होते. यानंतर गर्भगृहात जलाभिषेक करून त्यांनी पूजा केली. नुकतच केएल राहुलचंही लग्न झालं आहे. ज्यानंतर लगेचच सोमवारी क्रिकेटर अक्षर पटेलही पत्नी मेहा पटेलसोबत भगवान महाकाल देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला. त्यांनीही भस्म आरतीनंतर गर्भगृहात पूजनही केलं.

तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये होणार  

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघाने पहिले 2 सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, भारतीय संघाने तिसरा सामना जिंकला तर पुन्हा एकदा टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकेल. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत संघाने एक डाव आणि 132 धावांनी आणि दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत 6 गडी राखून विजय मिळवला. आता तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरु होत आहे.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Gautam Gambhir on Sanju Samson : 4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget