एक्स्प्लोर

Natasa Stankovic : एकीकडे हार्दिक पांड्याच्या डेटिंगची अफवा; दुसरीकडे नताशा अचानक मुंबईत परतली; नेमकं कारण काय?

Natasa Stankovic Returns To Mumbai : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविक अलीकडेच एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले आहेत.

Natasa Stankovic Returns To Mumbai : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविक अलीकडेच एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले आहेत. हार्दिकपासून वेगळी झाल्यानंतर नताशा मुलगा अगस्त्यसोहत सर्बियाला गेली होती. यासोबत अष्टपैलू खेळाडू आपल्या जीवनात आणि कामात व्यस्त झाला होता. 

यादरम्यान, पांड्याचे नाव अनेक वेगवेगळ्या सुंदरींशी जोडले गेले, त्यातील नवीनतम एंट्री होती गायिका जास्मिन वालिया. दुसरीकडे, नताशा आणि अगस्त्य सर्बियामध्ये पूर्णपणे तल्लीन झाले होते, त्यामुळे आता दोघेही भारतात परतणार नाहीत, असे चाहत्यांना वाटत होते. दरम्यान, नताशाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असून ती मुंबईत आली आहे.

नताशा अचानक परतली मुंबईत

अलीकडेच नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केलेल्या अपडेटद्वारे सर्बियाहून मुंबईत परतल्याची माहिती दिली. पहिल्या फोटोत तिने विमानाच्या आतील लूक शेअर केला आहे. आणि नंतर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात लिहिले आहे, हॅलो मुंबई. यावरून ती मुंबईत आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नताशा कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली आहे की यामागे आणखी काही खास कारण आहे, हे केवळ तीच सांगू शकते.

हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाचे खरे कारण काय?

एका रिपोर्टमध्ये नतासा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाचे खरे कारण समोर आले आहे. रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, हार्दिक नताशाच्या बाबतीत खूप नकली वागत होता आणि तो स्वतःमध्येच राहत होता. नताशाला ते अधिक सहन होत नव्हते. त्यांच्यात माणूस म्हणून खूप फरक आहे. जसजसा वेळ निघून गेला तसतसे नताशाच्या लक्षात आले की दोघेही एकसारखे नाहीत आणि एकत्र राहणे कठीण आहे. शेवटी तिला क्रिकेटरशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.

हार्दिक पांड्याच्या डेटिंगची अफवा

नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता हार्दिक पांड्याचं नाव ब्रिटीश गायिका जस्मिन वालियासोबत जोडलं जात आहे. दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत. खरं तर, ग्रीसमधील त्यांचे सेम फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली. याशिवाय, जस्मिनचा एका मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल झाला आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या हातावर एक टॅटू होता. जो हार्दिकसारखा वाटत होतात. मात्र, या अफवांवर हार्दिक किंवा जस्मिन दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे ही वाचा -

रोहित शर्मा OUT, विराट कोहली, एमएस धोनी IN; गौतम गंभीरने जाहीर केली भारताची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget