एक्स्प्लोर

MPL 2023 : टायटन्सपुढे सोलापूरचा 79 धावांत खुर्दा, नाशिकचा 82 धावांनी रॉयल विजय 

धनराज शिंदे(नाबाद 42),  प्रशांत सोळंकी(3-12), अक्षय काळोखे(2-26)यांची सुरेख कामगिरी 

MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या भेदक गोलंदाजीपुढे सोलापूरचा 79 धावांत खुर्दा उडाला. नाशिकने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सोलापूरचा संघ 79 धावांपर्यंत मजल मारु शकला. नाशिकने हा सामना 82 धावांच्या फरकाने जिंकला. धनराज शिंदेची उपयुक्त नाबाद 42 धावांची खेळी, तर प्रशांत सोळंकी(3-12), अक्षय काळोखे(2-26) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सोलापूर रॉयल्स संघावर 82 धावांनी विजय मिळवत आपली विजयी मालिका कायम ठेवली.   

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी यशस्वी ठरवला. सलामीचा फलदांज हर्षद खडीवाले (0 धावा) याला विकी ओस्तवालने आपल्या गोलंदाजीवर दुसऱ्याच चेंडूवर झेल बाद केले. तर, मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अर्शिन कुलकर्णी (18धावा) याला आज मोठी खेळी करता आली नाही. त्याला जलदगती गोलंदाज प्रणव सिंगने पायचीत बाद करून गोलंदाजीत चांगली साथ दिली. 

वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे नाशिक संघ 3.5 षटकात 3 बाद 28 असा अडचणीत सापडला. त्यानंतर कौशल तांबे(27धावा) व सिद्धेश वीर यांनी चौथ्या गड्यासाठी 40 चेंडूत 51 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी कौशलला सोलापूरच्या फिरकीपटू सुनील यादवने यष्टीच्या मागे झेल बाद करून नाशिकला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर धनराज शिंदेने 20 चेंडूत 3चौकार व 3 षट्काराच्या नाबाद 42 धावांची खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. धनराजला अक्षय काळोखे (13धावा) याने साथ दिली व या दोघांनी सातव्या गड्यासाठी 14 चेंडूत 37 धावांची भागीदारी करून संघाला 161 धावांचे आव्हान उभे करून दिले. 

161 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या सोलापूर रॉयल्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. नाशिकच्या प्रशांत सोळंकी (3-12), अक्षय काळोखे (2-26) या तीन फिरकी गोलंदाजांनी सोलापूरचा डाव 16.3 षटकात सर्वबाद 79 धावात उध्वस्त केला. यामध्ये लेगस्पिनर प्रशांत सोळंकी (3-12), डावखुरा अक्षय काळोखे (2-26) व अक्षय वाईकर (1-12) यांचा मोलाचा वाटा होता. यात यश नाहर (17धावा), यासर शेख (11धावा), ऋषभ राठोड (32धावा) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.   

डावखुरा फिरकीपटूअक्षय काळोखेने अथर्व काळे (7धावा) आणि सुनील यादव (0धावा) आपल्या हफ्त्यातील शेवटच्या चौथ्या षटकातील दोन चेंडूवर दोन बळी घेतले व आपले याचबरोबर षटकही पूर्ण केले. आता त्याला सोमवारी पुणेरी बाप्पा विरुद्ध होणाऱ्या लढतीत त्याने आपल्या पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यास त्याला एक अनोखी हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे.  

ईगल नाशिक टायटन्स संघाला विजयाची हॅट्रिक साजरे करण्याची संधी 

ईगल नाशिक टायटन्स संघाला सोमवारी सलग तिसऱ्या विजयाची संधी असली तरी त्यांच्यासमोर पुणेरी बाप्पा संघाचे कडवे आव्हान असणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघाकडून चमकदार कामगिरीच्या करणाऱ्या राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्यामधील झुंज पाहायला मिळणार आहे. राहुल त्रिपाठीला अजून म्हणावी तशी लय गवसलेली नाही हि त्या संघांची मूळ डोकेदुखी आहे.  ईगल नाशिक टायटन्स संघाने सोमवारी होणाऱ्या पुणेरी बाप्पा विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर त्याना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकवण्याची संधी असणार आहे.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 
ईगल नाशिक टायटन्स: 20 षटकात 7बाद 161 धावा(धनराज शिंदे नाबाद 42(20,3x4,3x6), सिद्धेश वीर 27, कौशल तांबे 27, मंदार भंडारी 19, अर्शिन कुलकर्णी 18, राहुल त्रिपाठी 10, अक्षय काळोखे 13, सुनील यादव 2-20, प्रणव सिंग 2-39, विकी ओस्तवाल 1-20) वि.वि.सोलापूर रॉयल्स: 16.3 षटकात सर्वबाद 79धावा(ऋषभ राठोड 32(34,3x4), यश नाहर 17, यासर शेख 11, प्रशांत सोळंकी 3-12, अक्षय काळोखे 2-26, अर्शिन कुलकर्णी 1-8, अक्षय वाईकर 1-12); सामनावीर-धनराज शिंदे; ईगल नाशिक टायटन्स संघ 82 धावांनी विजयी.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
Embed widget