एक्स्प्लोर

सिडनी कसोटीतील माझ्याच दोन चुका भारताला महागात, 12 वर्षांनी स्टीव्ह बकनर यांची कबुली

2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला 122 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्याच्या 12 वर्षांनी सामन्यातील पंच स्टीव्ह बकनर यांनी आपण दोन चुका केल्याची कबुली दिली आहे. या दोन चुका कोणत्या?

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2008 मध्ये झालेला सिडनीतील कसोटी सामना हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त सामना समजला जातो. या सामन्यात पंचांनी अतिशय चुकीचे निर्णय घेतले होते, ज्यामुळे क्रिकेट विश्वाच्या नजरा या सामन्याकडे वळल्या होत्या. आता आयसीसीचे माजी पंच स्टीव्ह बकनर यांनी 12 वर्षांनंतर या सामन्याबाबत खुलासा केला आहे. 2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामधली कसोटी मालिकेदरम्यान दोन चुका केल्याचं स्टीव्ह बकनर यांनी 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीमध्ये खेळवलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह बकरन आणि मार्क बेन्सन हे पंच होते. या सामन्यात दोन्ही पंचांनी काही चुकीचे निर्णय दिले, ज्यामुळे भारताला या सामन्यात 122 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे या सामन्यातील वादग्रस्त निर्णयांमुळे भारतीय संघाने स्टीव्ह बकनर आणि मार्क बेन्सन या दोन पंचांची तक्रार केली होती.

स्टीव्ह बकनर यांच्या दोन चुका या सामन्याच्या 12 वर्षांनी स्टीव्ह बकनर यांनी अखेरीस आपल्या चुका स्वीकारल्या आहे. बकनर म्हणाले की, मी 2008 मध्ये सिडनी कसोटीदरम्यान दोन चुका केल्या. माझी पहिली चुकी होती की, भारत चांगली कामगिरी करत असताना, मी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला शतक करण्यास दिलं.

माझी दुसरी चूक ही सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी होती, कदाचित त्यामुळे भारताचा पराभव झाला. या कसोटी सामन्यात दोन चुका करणारा मी पहिला पंच होतो का? तरीही या दोन चुका मला बेचैन करतात. या चुका का झाल्या हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.

अँड्र्यू सायमंड्सला जीवदान अँड्र्यू सायमंड्सला जीवदान देणं हा पहिला चुकीचा निर्णय असल्याचं स्टीव्ह बकरन यांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियाचं संघ अतिशय अडचणीत होता. सहा विकेट्सच्या मोबदल्यात संघाने केवळ 135 धावाच केल्या होत्या. सायमंड्स त्यावेळी 30 धावांवर खेळत होता. तेव्हा भारताच्या ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर चेंडू सायमंड्सच्या बॅटला चाटून यष्टीरक्षकाकडे गेला. परंतु बकनर यांनी त्याला बाद ठरवलं नाही. यानंतर सायमंड्सने 160 धावांची खेळी रचत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 463 वर नेऊन पोहोचवली.

द्रविड बाद देण्याचा चुकीचा निर्णय राहुल द्रविडला बाद ठरवलं ही आपली दुसरी चूक असल्याचं बकनर म्हणाले. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतासमोर 72 षटकात 333 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सौरव गांगुलीसोबत राहुल द्रविड फलंदाजी करत होता. परंतु 34व्या षटकात 38 धावा केल्या असताना बकनर यांनी द्रविडला सायमंड्सच्या गोलंदाजीवर झेलबाद ठरवलं. रिप्लेमध्ये पाहिलं असता चेंडू द्रविडच्या बॅटऐवजी पॅडला लागून गेला होता. या सामन्यात भारताचा 122 धावांनी पराभव झाला होता.

हरभजन आणि सायमंड्समधील 'मंकी गेट' प्रकरण स्टीव्ह बकरन यांच्या चुकांशिवाय भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू अँड्र्यू सायमंड यांच्यामध्ये झालेल्या मंकी गेट प्रकरणामुळेही ही मालिका वादग्रस्त ठरली होती. वाद एवढा वाढला की आयसीसीला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
×
Embed widget