Murli Vijay Record : जवळपास आठ तास फलंदाजी करत होता मुरली विजय, पुजारासोबत उभारला होता धावांचा डोंगर
Murali Vijay : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने टीम इंडियासाठी 12 कसोटी शतकं झळकावली आहेत
Murali Vijay Record India : भारतीय संघाचा (team india) सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली. त्याने या पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे (Team India) आभारही मानले आहेत. विजयला भारताकडून वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये 61 सामने खेळले. यादरम्यान त्याने 12 शतकंही झळकावली. विजयच्या नावावर एक विशेष रेकॉर्डही नोंदवला गेला आहे. भारताकडून खेळताना त्याने चेतेश्वर पुजारासोबत कसोटीत दुसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली आहे.
हा सामना होता भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात फेब्रुवारी-मार्च 2013 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील. या मालिकेतील दुसरा सामना 2 मार्चपासून हैदराबादमध्ये खेळवण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 237 धावा करून पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात टीम इंडियासाठी मुरली विजय आणि वीरेंद्र सेहवाग सलामीला आले. सेहवाग अवघ्या 6 धावा करून बाद झाला. सेहवाग बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला. पुजारा आणि विजय यांच्यात ऐतिहासिक भागीदारी झाली. दोघांनी मिळून 370 धावा केल्या. भारतासाठी दुसऱ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी कसोटी भागीदारी ठरली. हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात 361 चेंडूंचा सामना करत 167 धावा केल्यानंतर विजय बाद झाला. त्याने एकूण 473 मिनिटे फलंदाजी केली. जर त्याचे तासांमध्ये रूपांतर केले तर ते सुमारे 8 तास होईल. दुसरीकडे पुजाराने द्विशतक झळकावलं. त्याने 204 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात एकूण 503 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात 131 धावा करून बाद झाला. अशा प्रकारे भारताने हा सामना एक डाव आणि 135 धावांनी जिंकला. या सामन्यात पुजारा आणि विजयची खेळी संस्मरणीय ठरली.
मुरली विजयची सोशल मीडिया पोस्ट-
@BCCI @TNCACricket @IPL @ChennaiIPL pic.twitter.com/ri8CCPzzWK
— Murali Vijay (@mvj888) January 30, 2023
मुरली विजय भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 61 कसोटी सामन्यांच्या 105 डावांमध्ये 38.28 च्या सरासरीने 3982 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून 12 शतकं आणि 15 अर्धशतकं झळकली आहेत. याशिवाय त्याने 17 एकदिवसीय सामन्यांच्या 16 डावांमध्ये 21.18 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने अर्धशतक झळकावले आहे. 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने 18.77 च्या सरासरीने आणि 109.74 च्या स्ट्राइक रेटने एकूण 169 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-