Murli Vijay : भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती, बऱ्याच दिवसांपासून संधी न मिळाल्यानंतर घेतला निर्णय
Cricketer Murali Vijay Retirement: एकीकडे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त असताना भारतीय सलामीवीर मुरली विजयने निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
![Murli Vijay : भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती, बऱ्याच दिवसांपासून संधी न मिळाल्यानंतर घेतला निर्णय Murali Vijay announces retirement from all forms of International cricket know about this player, his records in details Murli Vijay : भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती, बऱ्याच दिवसांपासून संधी न मिळाल्यानंतर घेतला निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/06938e32db9a2d8f902d95622f851b091673671544826300_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Murali Vijay Retirement : भारतीय संघाचा (team india), खासकरुन कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. त्याने स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली. विजयने 2018 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. विजयला संघात स्थान मिळवण्यात सातत्याने अपयश येत होते. त्यामुळे अखेर त्याने क्रिकेटला अलविदा (Cricketer Murali Vijay Retirement) करण्याचा निर्णय घेतला. 38 वर्षीय मुरली विजय भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. 2008 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विजयने त्याच्या निवृत्तीबद्दल ट्वीट केले आणि लिहिले, “आज मी कृतज्ञता आणि नम्रतेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करतो. 2002 ते 2018 हा माझा प्रवास असून या खेळाच्या सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान होता.'' त्याने पुढे लिहिले की, “मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज यांचा आभारी आहे. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ, तुम्हा सर्वांसोबत खेळणे ही एक मोठी गोष्ट होती आणि मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.''
तसंच मुरली विजयने पुढे लिहिले की, “मी हे जाहीर करताना आनंदी आहे की मी क्रिकेट जगतात आणि त्यासंबधित व्यवसायात नवीन संधी शोधत आहे, जिथे मी माझ्या आवडीच्या खेळात आणि नवीन आणि वेगळ्या वातावरणात भाग घेत राहीन. मला विश्वास आहे की एक क्रिकेटर म्हणून माझ्या प्रवासातील ही पुढची पायरी आहे आणि मी माझ्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची वाट पाहत आहे.''
मुरली विजयची सोशल मीडिया पोस्ट-
@BCCI @TNCACricket @IPL @ChennaiIPL pic.twitter.com/ri8CCPzzWK
— Murali Vijay (@mvj888) January 30, 2023
अशी होती आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मुरली विजय भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 61 कसोटी सामन्यांच्या 105 डावांमध्ये 38.28 च्या सरासरीने 3982 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून 12 शतकं आणि 15 अर्धशतकं झळकली आहेत. याशिवाय त्याने 17 एकदिवसीय सामन्यांच्या 16 डावांमध्ये 21.18 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने अर्धशतक झळकावले आहे. 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने 18.77 च्या सरासरीने आणि 109.74 च्या स्ट्राइक रेटने एकूण 169 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)