एक्स्प्लोर

कॅप्टन कूल पुन्हा एकदा चर्चेत! फ्लाईटमध्ये 'हा' गेम खेळताना दिसला धोनी, लाखो लोकांना केला डाऊनलोड

MS Dhoni Viral Video : धोनीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या 3 तासांत 30 लाखहून अधिक लोकांना Candy Crush गेम डाऊनलोड केला.

Dhoni Playing Candy Crush in Flight : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यामागचं कारण क्रिकेट नसून काही वेगळंच आहे. कॅप्टन कूल धोनी इंडिगो फ्लाईटमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये धोनीच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकलीच पण, हा व्हिडीओ आणखी एका कारणामुळे चर्चेत आला. फ्लाईटमध्ये धोनी टॅबवर गेम खेळताना नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि चाहत्यांनाही हा गेम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यामुळे गेम कंपनीचा मात्र मोठा फायदा झाला.

फ्लाईटमध्ये 'हा' गेम खेळताना दिसला धोनी

जगभरात असे अनेक खेळाडू आहेत जे लक्झरी लाईफस्टाईल जगतात आणि प्रवासासाठी खाजगी जेट किंवा बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतात, पण चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी अत्यंत साधेपणाने जीवन जगतो. त्याची हीच खासियत चाहत्यांच्या मनात घर करून गेली आहे. धोनीच्या सरळ आणि साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. धोनी रविवारी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला. या दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धोनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.

पाहा धोनीचा व्हायरल व्हिडीओ :

धोनी कँडी क्रश खेळताना दिसला 

पण या फ्लाईटदरम्यान असे काही घडले, जे चाहत्यांच्या नजरेतून चुकलं नाही. धोनी आपल्या टॅबलेटवर आरामात कँडी क्रश खेळत बसला होता, तेव्हा एअर होस्टेस त्याच्याजवळ आली आणि मिठाई आणि चॉकलेट्सचा ट्रे धोनीसमोर ठेवला. यावर धोनीने ओम्नी डेट्सचे पॅकेट उचलले, त्यानंतर एअर होस्टेसही धोनीशी बोलताना दिसली. धोनी आणि एअर होस्टेसच्या संवादाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या फ्लाईटमध्ये धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी धोनीही दिसत आहे.

काय म्हणाली कंपनी?

धोनीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, ट्विटरवर कँडी क्रश ट्रेंड होऊ लागला. ट्विटरवर एक ट्वीट व्हायरल होत आहे, या ट्वीटमध्ये मोबाईल गेमिंग ऍप्लिकेशनने दावा केला आहे की, 3 दशलक्षाहून अधिक लोकांनी फक्त तीन तासांमध्ये कँडी क्रश अॅप डाउनलोड केला. 'कँडी क्रश'च्या ट्विटर पेजने धोनीला गेम ट्रेंड केल्याबद्दल धोनीचे आभार मानले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ''केवळ तीन तासांत 36 लाख नवीन लोकांनी गेम डाउनलोड केला. यासाठी भारताचा महान क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी याचे आभार. तुमच्यामुळेच आम्ही भारतात ट्रेंड करत आहोत.'' पण कँडी क्रशचं अधिकृत ट्विटर हँडल @CandyCrushSaga वरून असं कोणतेही ट्विट पोस्ट करण्यात आलेलं नाही.

धोनीमुळे कँडी क्रश गेम पुन्हा एकदा चर्चेत

दरम्यान, @CandyCrushSaga या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे. धोनीमुळ कँडी क्रश गेम पुन्हा एकदा चर्चेत आला. कँडी क्रश 2014-2015 या वर्षातील सर्वात लोकप्रिय गेम होता. या काळात हा गेम खूप लोकप्रिय होता. अनेक लोक बस, मेट्रो किंवा ट्रेनमध्ये कँडी क्रश खेळताना दिसत होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget