MS dhoni: चाळीसी ओलांडलेला धोनी किती वर्षाचा झाला? माहीने साधेपणाने साजरा केला 'हॅप्पी बर्थ डे'
MS dhoni: धोनीच्या बर्थ डेचा एक व्हिडिओ समोर आला असून केक कट केल्यानंतर माहीने टेनिस कोच मित्राला केक भरवल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंंबई : टीम इंडियाला (Team india) टी-20 आणि विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendrasingh dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर आयपीएलच्या माध्यमातून माही अद्यापही चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून तो आपली धुव्वादार फलंदाजी आणि विकेटकिंपगची झलक दाखवून देतोय. 7 जुलै आज क्रिकेट चाहत्यांच्या लाडक्या माहीची हॅप्पीवाला बर्थ डे (Happy Birthday), चाळीसी ओलांडलेला महेंद्रसिंह धोनी आज 44 वर्षांचा झाला. धोनी सध्या रांची येथील आपल्या दलादलीस्थित फार्म हाऊसवर सुट्या एन्जॉय करत आहे. आपल्या मित्रांसमवेत धोनीने याच फॉर्म हाऊसवर आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. जेएससीए (झारखंड क्रिकेट असोसिएशन) स्टेडियममधील कर्मचाऱ्यांसोबत केक कापून आपला बर्थ साधेपणाने साजरा केला, यावेळी जेएससीए अध्यक्ष अजय नाथ शाहदेव हेही उपस्थित होते.
धोनीच्या बर्थ डेचा एक व्हिडिओ समोर आला असून केक कट केल्यानंतर माहीने टेनिस कोच मित्राला केक भरवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर, जेएससीएचे अध्यक्ष आणि तेथील कर्मचाऱ्यांना देखील धोनीने बर्थ डे चा केक खाऊ घातला. माहीचा वाढदिवस असल्याने आज दिवसभर सोशल मीडियातून धोनीला शुभेच्छा दिल्या जात आहेत. धोनीचे चाहते, त्याच्या क्रिकेट आठवणी आणि मैदानावरील फोटो, व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा देताना दिसून आले. विशेष म्हणजे धोनीच्या फॉर्म हाऊसबाहेरही त्याच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, धोनीचा बर्थ डे साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून आपली कामगिरी बजावलेल्या महेंद्रसिंह धोनीने कोराना कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर, आयपीएल क्रिकटमधून देखील धोनीच्या निवृत्तीच्या अनेकदा चर्चा समोर आल्या. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्येही धोनीने आपले हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांना दाखवले. तसेच, निवृत्तीबाबत सध्या विचार नसल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले होते.
Happy birthday, Mahi. ❤️ pic.twitter.com/jSLVgHVMAy
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) July 7, 2025
शेवटचा सामना 2019 च्या वर्ल्डकपमध्ये
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 2020 मध्ये बाय बाय केला. तत्पूर्वी, धोनीने टीम इंडियासाठी आपला शेवटचा सामना वर्ल्डकप 2019 च्या स्पर्धेत न्यूझिलंडविरुद्ध खेळला होता. मालिकेतील तो उपांत्य सामना होता. त्यानंतर, टीम इंडियाच्या जर्सीत धोनी पुन्हा मैदानावर पाहायला मिळाला नाही. मात्र, सीएसकेच्या जर्सीतून त्याने चाहत्यांना आनंद दिला.
हेही वाचा
मी तुला विकत घेऊ शकतो, अर्धनग्न अवस्थेत तरुणाची राजश्री मोरेला शिवीगाळ; आता, मनसेकडून पत्रक





















