एक्स्प्लोर

MS Dhoni Birthday: धोनीच्या वाढदिवसापूर्वीच चाहत्यांकडून सेलिब्रेशनची तयारी; हैदराबादमध्ये लावलं 52 फूट उंच कटआऊट

MS Dhoni Cutout In Hyderabad: महेंद्र सिंह धोनीच्या वाढदिवसाआधीच त्याच्या चाहत्यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. हैदराबादमध्ये चाहत्यांनी 52 फूट लांबीचा कटआऊट लावला आहे.

Dhoni Cutout: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे लाखो चाहते आहेत. शुक्रवारी (7 जुलै) महेंद्र सिंह धोनीचा वाढदिवस आहे, पण त्याआधीच त्याच्या चाहत्यांनी धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी केली आहे. धोनी अजूनही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळतो, तो चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार आहे. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये धोनीचे अनेक चाहते आहेत, याचा अंदाज त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून लावता येतो. धोनीच्या वाढदिवसाआधीच सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. हैदराबादमध्ये चाहत्यांनी त्याचा उंचच असा कटआऊट लावला आहे.

धोनी 7 जुलै रोजी 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे, त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांनी हैदराबादमध्ये 52 फूट उंच कटआऊट लावले आहे. धोनीच्या कटआऊटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. धोनीच्या फॅन क्लबने कटआऊटचा फोटो ट्विट केला आहे आणि अनेकांना तो आवडला आहे. यासोबतच माहीच्या कटआऊटबाबत सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

धोनीची अविस्मरणीय कामगिरी

विशेष म्हणजे धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कमालीची राहिली आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषकात विजेतेपद पटकावलं. धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय सामने खेळले आहेत, त्याने 90 कसोटी सामन्यांमध्ये 4 हजार 876 धावा केल्या आहेत. धोनीने 6 शतकं आणि 33 अर्धशतकं केली आहेत. धोनीने एकदा द्विशतकही झळकावले आहे. त्याने 350 वन-डे सामन्यांमध्ये 10 हजार 773 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 10 शतकं आणि 73 अर्धशतकं झळकावली. धोनीने वनडेत सर्वोत्तम 183 रन्स काढले आहेत. त्याने भारतासाठी 98 टी-20 सामन्यांमध्ये 1 हजार 617 धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याने दोन शतकं झळकावली आहेत.

एमएस धोनीने आपल्या शानदार कारकीर्दीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. धोनीला त्याच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2009 मध्ये भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार - पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. धोनीला एक उत्तम कर्णधार आणि नेतृत्व कौशल्यासाठी 2007 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे धोनीला 2008 आणि 2009 मध्ये दोनदा ICC ODI 'प्लेयर ऑफ द इयर' म्हणून घोषित करण्यात आलं. 2008, 2009 आणि 2013 मध्ये तीन वेळा त्याची ICC 'कॅप्टन ऑफ द इयर' म्हणून निवड करण्यात आली. टाईम मॅगझिनने जगातील पहिल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची नोंद केली होती. तसेच, फोर्ब्स मासिकाने जगातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून त्याला यादीत स्थान दिलं.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget