MP vs MUM, Ranji Trophy Final, Day 3 Live Updates: तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर
Madhya Pradesh vs Mumbai, Ranji Trophy 2022 Final Day 3 Live Cricket Score : मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 24 Jun 2022 05:10 PM

पार्श्वभूमी
Ranji Trophy 2022 Final Day 3: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं...More
Ranji Trophy 2022 Final Day 3: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं मध्य प्रदेशला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबईनं पहिल्या डावात 374 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशच्या संघानं या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर एक विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. हिमांशू मंत्रीच्या रूपानं मध्य प्रदेशच्या संघाला पहिला धक्का बसलाय. तुषार देशपांडेच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. हिमांशूनं 50 चेंडूत 31 धावा केल्या. मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर आहे. सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वालची चमकदार कामगिरीमुंबईची धावसंख्या 374 वर पोहचवण्यात सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वालचा मोलाचा वाटा आहे. या सामन्यात सर्फराज खाननं 134 धावांची तर, यशस्वी जैस्वालनं 78 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशकडून गौरव यादवनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये सर्फराजचाही समावेश आहे. शतक झळकावताच सर्फराज खानला अश्रू अनावरमध्य प्रदेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात शतक झळकावताच सर्फराज खानला अश्रु अनावर झालं. तसेच शतकानंतर त्यानं सिद्धु मुसेवालाच्या शैलीतही सेलिब्रेशन केलं. रणजी ट्रॉफीच्या 87 वर्षांच्या इतिहासात सर्फराज खान दोन हंगामात 900 धावांचा टप्पा पार करणारा केवळ खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीतील 34 डावात त्यानं आठ वेळा शंभरचा आकडा गाठलाय. तर, सात वेळा 150 हून अधिक धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णयरणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉचं अर्धशतक हुकलं. तर, यशस्वी जैस्वालनं 78 धावा करून बाद झाला. मुंबईच्या संघानं 350 धावांचा टप्पा पार केला असून 119 धावांसह मैदानात उपस्थित आहे. हे देखील वाचा- Ranji Trophy 2022 Final Day 2: दुसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर, मुंबईची कामगिरी कशी?Joe Root: जो रूट कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत?SL vs AUS: जखमेवर मीठ! एकदिवसीय मालिका गमावलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत
MP vs MUM, Ranji Trophy Final: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत. मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर आहे.