मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळली, 4 थ्या दिवशी अंगात त्राण नाही; दोन्ही हातांनी धरुन स्टेजवर आणलं
मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आज 4 था दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे.
Manoj jarange patil strike health
1/8
मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आज 4 था दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे.
2/8
आजपासून जरांगे पाटील यांनी पाणी पिणे सोडून दिले आहे, मात्र मराठा बांधवांच्या आग्रहास्तव त्यांनी थोडं पाणी प्यायलं होतं.
3/8
गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू असल्याने त्यांच्या अंगात ताकद राहिली नाही, शरीर गळपटून गेले आहे, तर आवाजातही कातरपणा आल्याचं पाहायला मिळालंय
4/8
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली असून अंगात त्राण उरले नसल्याचं दिसून येत आहे. जरांगे पाटील यांना त्यांचे सहकारी दोन्ही हातांना पकडून स्टेजवत नेत आहेत.
5/8
उपोषणामुळे आपल्या अंगात ताकद उरली नसतानाही जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी नाकारली. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांकडचे तपासणी यंत्र हे तूट फूट झालेले असल्याने तपासणी नाकारली.
6/8
रक्तदाब तपासणारे यंत्र हे चिंध्या बांधलेलं व तुटलेलं आहे, तर काल रक्तातील साखर तपासली असताना फक्त तीस दाखवली आमच्या मशीनने तपासली असता 86 दाखवली, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
7/8
जरांगे पाटील यांनी डॉक्टरच्या पथकाला जाण्यास सांगितले, सरकार मुद्दाम अशा डॉक्टरांना पाठवतो असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.
8/8
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, लवकरच आंदोलन सुटावे अशी अपेक्षा सर्वच मराठा बांधवांकडून व्यक्त होत आहे.
Published at : 01 Sep 2025 09:52 PM (IST)