Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 02 Sep 2025 01:12 PM
परभणीच्या मानवतमध्ये मराठा समाजाने केले मुंडण आंदोलन; जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी मागच्या 5 दिवसांपासून मुंबईत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आंदोलन करत असताना सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्यातील सरकार विरोधात व जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणीच्या मानवत येथील मराठा समाज बांधवांनी मुंडण आंदोलन केले आहे. तहसील कार्यालया बाहेरच हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली आहे. सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तसेच राज्यभर पाऊसही कोसळत आहे. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.