एक्स्प्लोर

Siraj : कानून के हात सिर्फ लंबे नही होते... स्पीडभी बढाते है, सिराजच्या बॉलिंगवेळी स्पीडगनवर 181.6 Kmph नोंद, सगळेच आश्चर्यचकित

Mohammed Siraj : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी आज सुरु झाली. पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज वेगळ्या कारणानं चर्चेत राहिला.

ॲडिलेड :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतानं 180 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 1 बाद 86 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना आज यश मिळालं नाही. मोहम्मद सिराज मात्र वेगळ्या कारणानं चर्चेत राहिला. पहिलं कारण म्हणजे मार्नस लाबूशनेच्या दिशेनं फेकलेला बॉल आणि दुसरं कारण म्हणजे त्यानंतर टाकलेल्या बॉलचा वेग हे होय. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या  25 व्या ओव्हरमध्ये  टाकलेल्या बॉलचा वेग 181.6  किमी/ प्रतितास इतका स्पीड गननं दाखवला. हे स्क्रीनवर पाहताच नेटकरी देखील सक्रीय झाले. त्यांनी मग मिम्स आणि मजेशीर पोस्ट करण्यास सुरुवात केली. 

स्पीड गननं वेग नोंदवण्यात चूक केल्यानं मोहम्मद सिराजनं टाकलेल्या बॉलचा वेग 181.6 किमी/ प्रतितास नोंदवला गेला. तांत्रिक अडचण आल्यानं हा वेग नोंदवला गेला होता. त्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती देखील करण्यात आली.  मात्र याबाबतचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका नेटकऱ्यानं कानून के हात सिर्फ लंबे नही होते, कभी कभी अनएक्सपेटेड तरीखेसे स्पीड बी बढाते है, अशी पोस्ट केली. 

सर्वाधिक वेगवान गोलंदाजीचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर सर्वाधिक वेगवान गोंलदाजीचा विक्रम आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेतील 2003 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 161.3 किमी/प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती. त्यानंतर यावेगानं कोणी देखील गोलंदाजी केलेली नाही. 

भारताच्या गोलंदाजांचा विकेट साठी संघर्ष 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना 20 विकेट काढण्यात यश आलं होतं. आज पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाची केवळ 1 विकेट काढता आली होती. ती देखील जसप्रीत बुमराहला मिळाली. मोहम्मद सिराज, हर्षित राणा यांना विकेट काढता आली नाही.

पहिल्या दिवशी काय घडलं?

भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली हे चांगली खेळी करु शकले नाहीत.तर, के.एल. राहुल, शुभमन गिल, रिषभ पंत, नितीशकुमार रेड्डी, आर. अश्विन हे चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मिशेल स्टार्कनं भारताच्या 6 विकेट घेतल्या. तर, भारताकडून केवळ जसप्रीत बुमराह एक विकेट काढण्यात यशस्वी ठरला. 

इतर बातम्या : 

मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
IND vs NZ 1st ODI : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
IND vs NZ 1st ODI Score : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : 6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Embed widget