Mohammed Shami Injury : देखो वो आ गया! टीम इंडियाचा ढाण्या वाघ मैदानात परतला; Live सामन्यात झाली होती दुखापत
चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला जात आहे.

Mohammed Shami Injury Update : चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने गोलंदाजीची सुरुवात केली, पण स्पेलमध्ये तीन षटके पूर्ण केल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. शमी खराब फिटनेसमुळे मैदाना बाहेर गेला आहे. पाचव्या षटकानंतर शमी मैदानाबाहेर गेला आणि त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला आहे. पण 12 व्या षटकात मोहम्मद शमी मैदानात परतला आहे. त्याने 12व्या षटकात चांगली गोलंदाजी केली आणि फक्त तीन धावा दिल्या. रिझवान आणि शकील यांचा वैयक्तिक 6-6 धावांवर खेळत आहे.
Accuracy 🔥
— BCCI (@BCCI) February 23, 2025
Axar Patel with a direct hit to earn the second wicket for #TeamIndia 👏 🎯
Updates ▶️ https://t.co/llR6bWz3Pl#PAKvIND | #ChampionsTrophy | @akshar2026 pic.twitter.com/cHb0iS2kaQ
पहिल्याच षटकात टाकले पाच वाईड बॉल
भारतीय गोलंदाजीची सुरुवात मोहम्मद शमीने केली. त्याने पहिल्याच षटक 11 चेंडू टाकावे लागले. यामध्ये 5 वाईड बॉलचा समावेश होता. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारताला पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव आणण्याची गरज होती, पण बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांना शमीचे कमकुवत चेंडू खेळण्यास काहीच अडचण आली नाही. चांगली गोष्ट म्हणजे शमीने पुढच्या दोन षटकांत एकही वाइड बॉल टाकला नाही.
5 wides in the first over from Mohammed Shami 👀
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 23, 2025
🔗 https://t.co/GyyTPuCgwg | #PAKvIND pic.twitter.com/HG2qUTWCUO
जर आपण मोहम्मद शमीच्या फिटनेसकडे पाहिले तर 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये त्याला घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला 14 महिने मैदानापासून दूर राहावे लागले. पण भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान समोर आलेल्या फोटोवरून असे दिसून येते की शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
Injury Scare For Mohammed Shami 🫣
— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) February 23, 2025
Was Seen Going Towards Dressing Room pic.twitter.com/Bc4lcSfsno
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 13 षटकांनंतर, पाकिस्तानने दोन विकेट गमावल्यानंतर 59 धावा केल्या. सध्या सौद शकील सात धावांसह आणि कर्णधार मोहम्मद रिझवान सहा धावांसह खेळत आहेत. बाबर (23) हार्दिकने झेलबाद केला तर इमाम-उल-हक थेट हिटवर अक्षरने धावबाद केला. शमीही मैदानात परतला आहे आणि गोलंदाजी करत आहे.
हे ही वाचा -





















