IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या डे-नाईट टेस्ट कसोटीतही येणार नाही मॅचविनर खेळाडू; BCCI ने सांगितले कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणार आहे.

Mohammed Shami IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही खेळण्याची शकता होती. मात्र आता शमी फक्त सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येच खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. संघाचे वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे बोर्डाने शमीलाही त्याच्या फिटनेसवर काम करायला लावले आहे.
शमीचे जोरदार पुनरागमन
शमी आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील तीन बॉर्डर-गावसकर मालिकेचा भाग राहिला आहे (2014-15, 2018-19 आणि 2020-21) आणि त्याने 8 कसोटी सामन्यांमध्ये 31 बळी घेतले आहेत. जवळपास वर्षभर संघातून बाहेर असलेल्या या वेगवान गोलंदाजाने दोन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी पुनरागमन केले. शमीने या सामन्यात सात विकेट घेत खळबळ उडवून दिली आणि संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या सामन्यातही त्याने शानदार फलंदाजी करत 39 धावा केल्या.
Confidence, faith and composure 🙌
— BCCI (@BCCI) November 26, 2024
Captain and Player of the Match Jasprit Bumrah on what it means to lead #TeamIndia to victory in the 1st Test 👌👌 - By @RajalArora
WATCH 🎥🔽 #AUSvIND | @Jaspritbumrah93
34 वर्षीय शमीने ताबडतोब ऑस्ट्रेलियाला जावे आणि पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाकडून खेळावे अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, शमीला ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आले नाही, त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी सांगितले की, व्यवस्थापन या वेगवान गोलंदाजावर बारीक लक्ष ठेवून आहे.
सिराज-हर्षितने केली चमकदार कामगिरी
शमीच्या अनुपस्थितीत हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत चमकदार कामगिरी केली. आपण हे विसरू नये की प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीप यांचाही या संघात समावेश आहे आणि ते आधीच त्यांच्या संधीची वाट पाहत आहेत. याशिवाय इतर चार वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद आणि यश दयाल हे देखील राखीव म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग आहेत.
हे ही वाचा -





















