![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mohammad Shami Record : मोहम्मद शमीनं कसोटीत षटकार ठोकण्याच्या बाबतीत राहुल द्रविडला टाकलं मागे, 'या' दिग्गजांनाही पछाडलं
IND vs AUS : मोहम्मद शमीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 23 षटकार झाले आहेत. त्याने 13 हजार कसोटी धावा करणाऱ्या राहुल द्रविडच्या (21) षटकारांची संख्या मागे टाकली आहे.
![Mohammad Shami Record : मोहम्मद शमीनं कसोटीत षटकार ठोकण्याच्या बाबतीत राहुल द्रविडला टाकलं मागे, 'या' दिग्गजांनाही पछाडलं Mohammad shami surpass rahul dravid test sixes tally most sixes in test cricket by indian IND v AUS Test Mohammad Shami Record : मोहम्मद शमीनं कसोटीत षटकार ठोकण्याच्या बाबतीत राहुल द्रविडला टाकलं मागे, 'या' दिग्गजांनाही पछाडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/70780bc7fdb345bb5ad92ad684c71c501676096947343300_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs AUS, 1st Test Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात नागपुरात खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीने 37 धावांची तडाखेबाज खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार ठोकले. दरम्यान आपल्या या खेळीमुळे मोहम्मद शमीने कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडला मागे टाकलं आहे. शमीनं 23 षटकार पूर्ण केले असून द्रविडला (21) त्याने मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या बाबतीत तो कसोटी क्रिकेटमध्ये अनेक भारतीय दिग्गज फलंदाजांपेक्षा पुढे पोहोचला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या राहुल द्रविडच्या नावावर केवळ 21 षटकार आहेत. पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 722 धावा केल्या असताना त्याने 23 षटकार ठोकले आहेत. त्याने यापूर्वीच चेतेश्वर पुजारा, मोहम्मद अझरुद्दीन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गजांना मागे टाकलं होतं.
VVS लक्ष्मणनं ठोकले आहेत 5 षटकार
चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजारांहून अधिक धावा केल्या पण यादरम्यान त्याने केवळ 15 षटकार मारले. मोहम्मद अझरुद्दीननेही आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 हजारांहून अधिक धावा केल्या मात्र त्याला केवळ 19 षटकार मारता आले. व्हीव्हीएस लक्ष्मण या बाबतीत खूप मागे आहे. 8 हजारांहून अधिक कसोटी धावा करणाऱ्या लक्ष्मणने आपल्या कसोटी कारकिर्दीत केवळ पाच षटकार मारले आहेत.
या खेळाडूंनी भारतासाठी कसोटीत ठोकले आहेत सर्वाधिक षटकार
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. या स्फोटक फलंदाजाने 104 कसोटी सामन्यांच्या 180 डावांमध्ये 91 षटकार ठोकले आहेत. एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 78 षटकार ठोकले. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टरने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 69 षटकार ठोकले.
भारतानं उभारला 400 धावांचा डोंगर
177 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यावर भारताकडून फलंदाजीला आलेल्या कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे पहिला दिवस संपताना भारतानं 77 धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुल 20 धावा करुन बाद झाला होता तर रोहित नाबाद 56 धावांवर क्रिजवर होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विन, विराट, केएस भरत, सूर्यकुमार, पुजारा हे सर्वजण स्वस्तात माघारी परतले. रोहितनं 120 धावा करत दमदार शतक ठोकलं. त्यानंतर जाडेजा आणि अक्षर यांनी एक दमदार भागिदारी उभारली पण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच जाडेजा 70 धावा करुन बाद झाला. मग शमीने 37 धावांची खेळी केली. ज्यानंतर अखेर अक्षर 84 धावा करुन बाद झाल्यावर 400 धावांवर भारताचा डाव आटोपला आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)