(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup : टीम इंडिया नाहीच, हे 4 संघ सेमीफायनलमध्ये जाणार, माजी कर्णधाराचं मोठं भाकीत
T20 World Cup 2024 Semi-finalist Prediction , इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं टी20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या चार संघाची भविष्यवाणी केली आहे. टॉप 4 संघात भारताला स्थान दिलं नाही.
Michael Vaughan, T20 World Cup 2024 Semi-finalist Prediction : टी20 विश्वचषकाबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं मोठी भविष्यवाणी (Michael Vaughan Prediction on T20 World cup 2024) केली आहे. मायकल वॉन यानं सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या चार संघाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे, मायकल वॉन यानं टॉप 4 संघात भारतीय संघाचं नाव घेतलं नाही. मायकल वॉन यानं ट्वीट करुन आपला अंदाज व्यक्त केला आहे.
मायकल वॉन याने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर करत सेमीफायनलच्या चार संघाची नावं सांगितली आहेत. यामध्ये टीम इंडियाचं नाव घेतलं नाही. मायकल वॉन यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले की," माझ्या मते, टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहचतील. " म्हणजे, मायकल वॉन याच्या मते टीम इंडिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यासारख्या संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल.
पाहा मायकल वॉनची पोस्ट -
My 4 Semi finalists for the T20 WC … England,Austrlalia,South Africa and the West Indies .. #T20WC2024
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 1, 2024
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी दोन वेळा टी20 विश्वचषक जिंकला -
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत दोन दोन वेळा टी20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियानं एकवेळा चषकावर नाव कोरलेय. तर दक्षिण आफ्रिका संघाने एकदाही चषकावर नाव कोरलेले नाही. मायकल वॉन यानं इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिक संघ सेमीफायनलमध्ये खेळतील, असं भाकित केलेय. त्यांचा हा अंदाज किती खरा ठरतोय हे काही दिवसांतच समजेल.
टी-20 वर्ल्ड कप 2024 फॉर्मेट (Format of ICC T20 World Cup 2024)
2 जूनपासून टी20 विश्वचषकाच्या रनधुमाळीला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये यंदा विश्वचषक होणार आहे. ही स्पर्धा तब्बल 20 संघामध्ये रंगणार आहे. 20 संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील. त्यानंतर सुपर 8 मधील संघाना चार चारच्या दोन गटात विभागलं जाईल. सुपर 8 मधील दोन ग्रुपमधील प्रत्येकी दोन दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहचतील. दोन सेमीफायनलचे सामने होतील. त्यामधील विजेत्या संघामध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
वर्ल्ड कप ग्रुप (ICC )
ग्रुप अ- भारत, पाकिस्तान, आयरलँड, कनाडा, यूएसए
ग्रुप ब- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलँड, ओमान
ग्रुप क- न्यूजीलंड, वेस्टइंडीज, अफगानिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप ड- दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, बांग्लादेश, नीदरलँड्स, नेपाल