IND vs BAN : स्पीड गन मयंक यादवची तुफानी एन्ट्री! आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील घेतली पहिली विकेट, कुणाची केली शिकार?
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मयंक यादवने शानदार कामगिरी करत आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे.
India vs Bangladesh Mayank Yadav : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते.
What a start to Mayank Yadav's international career 🔥 https://t.co/OqOTnH3GfM | #INDvBAN pic.twitter.com/VeNyu9WoWU
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 6, 2024
T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील घेतली पहिली विकेट
दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मयंक यादवने शानदार कामगिरी करत आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. पहिल्याच षटकात मेडन टाकणाऱ्या मयंकने दुसऱ्याच षटकात महमुदुल्लाला आऊट केले. महमुदुल्लाह दोन चेंडूंवर एक धाव काढून बाद झाला. बांगलादेशची सुरुवात खुपच खराब झाली. आठ षटके संपल्यानंतर 85 धावांत चार गडी गमावले आहेत.
पदार्पणात मयंक यादवचा अनोखा कारनामा
टी-20 मध्ये पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा भारतीय गोलंदाज आता मयंक यादवनेही प्रवेश केला आहे. पदार्पण करताना T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मेडन ओव्हर टाकणारा अजित आगरकर हा भारताचा पहिला गोलंदाज होता. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले आणि पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. यानंतर, 2022 मध्ये अर्शदीपने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. आता या यादीत मयंक यादवचा समाविष्ट झाला आहे. त्याने ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि पहिले ओव्हर मेडन टाकले.
Washington Sundar joins the wicket-taking party! 🥳
— BCCI (@BCCI) October 6, 2024
He takes a catch off his own bowling to dismiss Najmul Hossain Shanto 👏👏
Live - https://t.co/Q8cyP5jXLe#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZV3oX0UGrY
भारतीय संघ प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
बांगलादेश संघ प्लेइंग-11 : लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
हे ही वाचा -
IND vs PAK T20WC : भारताने पाकिस्तानला लोळवले; पॉइंट टेबल मोठा बदल, टीम इंडिया कोणत्या स्थानी?