Shefali Verma's Amazing Six: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात (ICC Women's World Cup 2022) भारतीय संघाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेत भारताला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर, तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. भारतीय महिला संघासाठी फलंदाजी ही अजूनही मोठी समस्या आहे. भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्माला पहिल्या सामन्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती. पण तिला मोठी धावसंख्या करता आली नाही. परंतु, या सामन्यात शेफाली वर्मानं मैदानाबाहेर पाठवलेल्या चेंडूची जास्त चर्चा रंगली आहे. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


शेफाली तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जातं. तिला ‘लेडी सेहवाग’ देखील म्हटलं जातं. विश्वचषकाच्या 18 व्या सामन्यात भारतीय  संघ ऑस्ट्रेलियाशी भिडला होता. या सामन्यातील पाचव्या षटकात शेफाली वर्माला फुल लेन्थ चेंडू मिळाला.  चेंडू तिच्या पारड्यात पडत असल्याचं पाहून त्याला तिनं जोरात मारला आणि चेंडू थेट साइटच्या समोर जाऊन पडद्यावर आदळला. या षटकाराचा व्हिडिओ आयसीसीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओवर यावर अनेक चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.


व्हिडिओ-


आयसीसी महिला विश्वचषकामध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी केली नाही. भारतीय संघाने आतापर्यंत पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. भारतानं आतापर्यंत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या संघाचा पराभव केलाय. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता भारताचा पुढचा सामना 22 मार्चला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha