IPL 2022: भारतातील लोकप्रिय लीग आयपीएल जगभरात प्रसिद्ध आहे. या लीगमधून खेळताना अनेक खेळाडूंनी मोठा पराक्रम करून दाखवले आहेत. तर, काही खेळाडूंनी आपल्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद केलीय. दरम्यान, एका षटकात दहा चेंडू दोन अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर नकोशा विक्रम नोंदवून घेतलाय. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजाचं नाव आहे. 


राहुल तेवातिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना राहुल तेवातियानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एका षटकात 10 चेंडू टाकले होते. आरसीबीच्या डावातील हा 9वं षटक होतं. या षटकात राहुल तेवातियानं 8 धावा दिल्या. या षटकात राहुल तेवातियानं सलग तीन वाईड चेंडू टाकले होते. 0 0 nb 1 2 wd wd wd 1 0  असं राहुल तेवतियानं षटक टाकलं होतं. 


ड्वेन ब्राव्हो
विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने 2021 साली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध अशीच लाजिरवाणी षटक टाकलं होतं. ब्राव्होनं या षटकात चार वाईड चेंडू टाकले होते. मात्र, या षटकात ब्राव्होनं फक्त सहा धावा दिल्या होत्या. wd wd 0 0 1 0 1 wd wd 0 अशी ब्राव्होनं गोलंदाजी केली होती.


दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. यावेळी श्रेयस अय्यर कोलकाताच्या संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha