Hyderabad fc Won : भारतात मागील काही वर्षांपासून फुटबॉल खेळाला काहीसे 'अच्छे दिन' आले आहेत. 2014 पासून भारताची स्वत:ची फुटबॉल लीग इंडियन सुपर लीग (ISL) सुरु झाली आहे. यंदा या लीगचा आठवा सीजन नुकताच पार पडला असून हैदराबाद फुटबॉल क्लबने केरळा ब्लास्टर्सला (Hyderabad fc vs Kerala blasters) मात देत चषकावर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे यामुळे केरळा ब्लास्टर्सचं विजयाचं स्वप्न तिसऱ्यांदा तुटलं आहे. सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये हैद्रबादचा गोलकीपर लक्ष्मीकांत कट्टीमनी (Laxmikant Kattimani) याने अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.


सामन्यात दोन्ही संघानी अप्रतिम कामगिरी केली, ज्यामुळे सामना अतिशय चुरशीचा झाला. हाल्फ टाईमपर्यंत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या हाल्फमध्येही बराच काळ स्कोर 0-0 होता. अखेर 68 व्या मिनिटाला केरळाच्या राहुल केपी (Rahul KP) याने गोल करत संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर केरळा संघ जिंकेल असं वाटत असताना 88 व्या मिनिटाला साहिल तवोरा (Sahil Tavora) याने गोल करत सामन्यात 1-1 ची बरोबरी साधली. त्यानंतर 90 मिनिटं झाल्यानंतर 30 मिनिटं एक्स्ट्रा टाईम खेळवला गेला. ज्यानंतर अखेर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आली. ज्यात हैद्राबादकडून गोलकिपर लक्ष्मीकांतने पहिले दोन्ही पेनल्टी शूट्स वाचवले. ज्यानंतर हैद्राबादच्या खेळाडूंनीही अप्रतिम गोल करत अखेर पेनल्टी शूटआऊट 3-2 ने विजय मिळवला. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha