KKR Predicted Playing XI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. यावेळी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. या सर्व संघाची गटात विभागणी करण्यात आली. तसेच एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. सर्व संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळतील. या स्पर्धेची सुरुवात कोलकाता कशी करते? कोलकात्याचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन कसा असेल? हे पाहुयात.


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरचा संघ मैदानात उतरणार
केकेआरने गेल्या वर्षी त्यांचा कर्णधार इयॉन मार्गननं रिलीज केलं. त्यानंतर आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यरला 12.25 कोटीत विकत घेतलं. यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यर कोलकात्याचा संघाचं नेतृत्व करणार आहे. अय्यरनं दीर्घकाळ दिल्लीचे कर्णधारपद संभाळलं असून तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.


कोलकाता संभाव्य प्लेइंग इलेव्हन
आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि पॅट कमिन्स.


कोलकाता नाईट रायडर्सचे शिलेदार 
आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख).      


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha