IND vs AUS, 1st ODI, Pitch Report : मुंबईच्या वानखेडे मैदानात रंगणार पहिला एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती? जाणून घ्या पिच रिपोर्ट
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याच आजपासून एकदिवसीय मालिका सुरु होत असून पहिला सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
IND vs AUS, ODI Series : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका आजपासून (17 मार्च) खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिकेत 1-0 ची आघाडी घेता येईल. तर ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका गमावल्या एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आज विजयाने सुरुवात करेल. तर आजच्या महत्त्वाच्या या सामन्यात मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ...
सामना होणाऱ्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही खेळपट्टी उच्च धावसंख्येसाठी ओळखली जाते. त्यामुळे फलंदाजीसाठी नंदनवन असणारी ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी फार घातक आहे. हे स्टेडियम देशातील सर्वात लहान मैदान आहे ज्यामुळे देखील गोलंदाजांना अधिक चौकार आणि षटकार खावे लागतात. वानखेडेमध्ये पहिल्या डावातील एकूण सरासरी 240 आहे, जी दुसऱ्या डावात 201 पर्यंत खाली घसरते. तसंच येथे खेळल्या गेलेल्या 27 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 13 प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 14 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे, नाणेफेक तितकी महत्त्वाची नसून दमदार खेळ करणारा संघच जिंकू शकतो.
हवामान कसं असेल?
मुंबईत 16 मार्च रोजी म्हणजेच सामन्याच्या एकदिवस आधी पाऊस झाल्याने आजही सामन्यादरम्यान पाऊस येईल अशी भीती होती. पण हवामान विभागाच्या अहवालानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यादरम्यान मुंबईचे हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल. सामन्याच्या वेळी मुंबई शहराचे तापमान 33 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पाच टक्के आकाश ढगाळ राहिल. या दरम्यान आर्द्रता 46 टक्के राहिल. एकूणच, सामन्यादरम्यान खेळाडूंना आर्द्रतेचा सामना करावा लागू शकतो.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
हे देखील वाचा-