एक्स्प्लोर

IND vs NZ, Playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध 'कुल्चा' जोडी मैदानात, उमरानच्या जागी चहलला संधी, कुलदीपही संघात, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs NZ: लखनौमध्ये सुरु झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात पहिल्या सामन्याचा विचार करता भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरत आहे.

India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) दुसऱ्या टी20 सामन्याला लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) सुरुवात झाली आहे. टॉस जिंकत न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता न्यूझीलंडने पहिल्या टी20 मधील संघच मैदानात उतरवला आहे. तर भारतीय संघानं मात्र एक महत्त्वाचा बदल केला आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) विश्रांती देत युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संघात संधी देण्यात आली आहे.

उमरानने पहिल्या सामन्यात बऱ्याच धावा दिल्या होत्या. केवळ एकाच षटकात त्याला 16 रन पडले होते. त्यामुळे आज त्याला विश्रांती दिली आहे. तसंच खेळपट्टीवर फिरकीपटू विशेषत: किवी संघाविरुद्ध अधिक फायदेशीर असल्यानं आणखी एका फिरकीपटूला भारतीय संघानं (Team India) मैदानात उतरवलं आहे. विशेष म्हणजे चहलसह कुलदीपही (Kuldeep Yadav) मैदानात असल्यानं भारताची प्रसिद्ध फिरकीपटूंची जोडी 'कुल्चा' मैदानात उतरली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...

भारतीय संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग

न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

भारतासाठी 'करो या मरो'चा सामना

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना भारतासाठी करो किंवा मरो असा असणार आहे. जर टीम इंडिया हा सामना हरली तर मालिका त्यांच्या हातून निघून जाईल. या मालिकेत किवी संघ 1-0 ने पुढे आहे. भारतीय संघाने गेल्या 10 वर्षांपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावलेला नाही. भारताने 2012 साली न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर शेवटची टी-20 मालिका गमावली होती. त्यानंतर किवींनी दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझाEknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines Oath ceremony 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Maharashtra CM Oath Ceremony : ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
Embed widget