VIDEO : तिसऱ्या कसोटीपूर्वी केएल राहुल पत्नीसह महाकाल देवाच्या दर्शनाला, पारंपरिक वेशभूषेत विधीवत पूजाअर्चा
Border-Gavaskar Trophy: मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या केएल राहुलने पहिल्या दोन्ही कसोटीतही खास कामगिरी केली नसून आता इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत तरी चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.
KL Rahul in IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, खराब फॉर्ममुळे सातत्याने टीका होत असलेला सलामीवीर केएल राहुल या सामन्यापूर्वी त्याची पत्नी अथिया शेट्टीसोबत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. त्याने त्याठिकाणी पोहोचून बाबा महाकालचे दर्शन घेत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलने खास कामगिरी केलेली नाही. सध्या त्याचा अतिशय खराब फॉर्म पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या प्लेईंग इलेव्हनमधील स्थानावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा राहुल संघाचा एक भाग होता पण त्याच्याकडून उपकर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. दरम्यान आता या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी केएल सराव करत असून पत्नी अथियासोबत देवदर्शनही करत आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यावर आता राहुल महाकालेश्वर मंदिरातही पोहोचला. केएल राहुलने अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केलं. ज्यानंतर आता दोघेही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगात पारंपारिक वेशभूषेत पूजा करताना दिसले, या सर्वाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
पाहा VIDEO-
Jab insaan har jagah se haar jaata hai to bhagwan hi sahara dete hain 💙🧡🙏#KLRahulpic.twitter.com/YT2HHmTv33
— Prayag (@theprayagtiwari) February 26, 2023
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने केला केएल राहुलचा बचाव
दिल्ली कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या दणदणीत विजयानंतर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना केएल राहुलच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचा बचाव केला आणि सांगितले की आम्ही केएलचे समर्थन करत राहू. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येणारा हा टप्पा असतो. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील शतकांसह परदेश दौऱ्यांमध्ये संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी राहुलकडे गुणवत्ता आहे. केएल राहुलने 2021 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी फॉर्मेटमध्ये शेवटचं शतक झळकावलं होते. त्यानंतर आतापर्यंत 12 डावांत त्याला एकदाच 50 धावांचा आकडा गाठता आला आहे.
इंदूर कसोटीसाठी संभाव्य संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुह्नमॅन.
हे देखील वाचा-