KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून IPL 2024 संदर्भात प्रश्न, 80 हजारांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय?
Kaun Banega Crorepati: कौन बनेगा करोडपतीमध्ये आयपीएल 2024 संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी 80 हजार रुपयांसाठी आयपीएलबाबत प्रश्न विचारला होता.
![KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून IPL 2024 संदर्भात प्रश्न, 80 हजारांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय? Kaun Banega Crorepati IPL 2024 season question in kbc by Amitabh Bachchan most valueable player KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून IPL 2024 संदर्भात प्रश्न, 80 हजारांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/14/5a1667e5aeb618ea72e8e6e8eea42ead1723631643824989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KBC Question On IPL 2024 नवी दिल्ली : कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) च्या 16 व्या हंगामाची सुरुवात झाली आहे. या शोचं सूत्रसंचालन महान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून केलं जातं. केबीसीच्या नव्या पर्वात अमिताभ बच्चन यांनी आयपीएल संदर्भात एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. बच्चन यांनी आयपीएल संदर्भातील प्रश्न 80 हजार रुपयांसाठी विचारला होता.
कौन बनेगा करोडपती या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी आयपीएल संदर्भातील प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की आयपीएलच्या 2024 च्या हंगामात ऑलराऊंड कामगिरीसाठी सर्वाधिक किमती खेळाडू कोण होता? यासाठी चार पर्याय देण्यात आले होते. यामध्ये सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कप्तान विराट कोहली, कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर सुनील नरे आणि सनरायजर्स हैदराबादच्या ट्रेविस हेडचं नाव होतं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर सुनील नरेन हे होतं. सुनील नरेन यानं आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक मूल्यवान खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला होता.
आयपीएल 2024 मध्ये सुनील नरेनची कामगिरी
आईपीएल 2024 मध्ये सुनील नरेन यानं दमदार कामगिरी केली होती. यामध्ये त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. सुनील नरेन यानं 21.65 च्या सरासरीनं 17 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्यानं बॅटिंगमध्ये 34.86 च्या सरासरीनं 180.74 च्या सरासरीनं 488 धावा केल्या होत्या. या दरम्यान सुनील नरेननं एक शतक केलं होतं तर तीन अर्धशतकं केली होती.
केकेआरनं मिळवलेलं विजेतेपद
आयपीएल 2024 चं विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सनं विजेतेपद मिळवलं होतं. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात श्रेयस अय्यर च्या नेतृत्त्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सनं विजेतेपद मिळवलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सनं तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 आणि 2014 च्या आयपीएलमध्ये देखील विजेतेपद मिळवलं होतं.
गौतम गंभीर अन् सुनील नरेनचं कनेक्शन
गौतम गंभीरकडे केकेआरला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असते त्यावेळी सुनील नरेनच्या कामगिरीत सुधारणा झालेली पाहायला मिळते. सुनील नरेनचं यापूर्वी देखील प्रमोशन करण्यात आलं होतं. 2024 च्या आयपीएलमध्ये सुनील नरेनला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय केकेआरसाठी फायदेशीर ठरला होता.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)