Karun Nair Century : गंभीर अन् आगरकरने टीम इंडियामधून ज्याला हाकलले, त्याच पठ्ठ्याने धुमाकूळ घातला, ठोकले तुफानी शतक
Karun Nair Century : रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामातील दुसऱ्या फेरीचे सामने सध्या सुरू आहेत. त्यात कर्नाटक आणि गोवा या संघामध्ये सामना खेळला जात आहे.

Karun Nair Century : रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामातील दुसऱ्या फेरीचे सामने सध्या सुरू आहेत. त्यात कर्नाटक आणि गोवा या संघामध्ये सामना खेळला जात आहे. या सामन्यात 33 वर्षांचा एक अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी या खेळाडूला टीम इंडियात पुनरागमनाची संधी मिळाली होती, पण केवळ एका मालिकेनंतर त्याला पुन्हा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, या खेळाडूने हार मानली नाही आणि एका जबरदस्त शतकाच्या खेळीने पुन्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
टीम इंडियातून बाहेर, पण रणजीत शतक ठोकले
भारतीय संघातून वगळण्यात आलेला फलंदाज करुण नायर पुन्हा एकदा मथळ्यांमध्ये झळकतोय. गोव्याविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात त्याने कर्नाटकसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. संघाची अवस्था खराब असताना नायरने संयमाने फलंदाजी करत कर्नाटकला मजबूत स्थितीत आणले. कर्नाटकच्या डावाची अवस्था एकवेळ 65 धावांत 4 विकेट्स अशी झाली होती, पण नायरने खेळाची दिशा बदलली आणि संघाला 300 धावांचा टप्पा पार करण्यात मदत केली.
💯 for Karun Nair 👏
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 1, 2025
A splendid knock on the big stage under pressure 💪
It's his 9⃣th 1⃣0⃣0⃣ in all formats combined this season, and the celebration says it all👌🙌#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #Final
Scorecard ▶️ https://t.co/up5GVaflpp pic.twitter.com/9MvZSHKKMY
करुण नायरने संयमी आणि जबाबदारीची फलंदाजी केली. पहिल्या दिवसाखेरीस तो 138 चेंडूंमध्ये 86 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याने आपली खेळी पुढे नेत 163 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या शतकात 8 चौकार आणि 1 षटकार होता. दुपारच्या सत्रापर्यंत नायर 226 चेंडूंमध्ये 140 धावा करत नाबाद होता. ही खेळी करुण नायरसाठी अनेक अर्थांनी विशेष ठरली आहे. कारण अलीकडेच त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले होते. तरीही त्याने आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे.
सातत्य आणि विक्रमांची चमक
नायरच्या फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील आकडेवारीत त्याची सातत्यपूर्ण कामगिरी स्पष्ट दिसते. आपल्या 122 व्या फर्स्ट-क्लास सामन्यात, त्याने जवळपास 49च्या सरासरीने 8,850 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 25 शतके आणि 38 अर्धशतके समाविष्ट आहेत. रणजी ट्रॉफीतही त्याने 18 शतके झळकावली असून, सुमारे 47.90 च्या सरासरीने 5,270 पेक्षा अधिक धावा त्याच्या नावावर आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर पुनरागमनाची शक्यता
या वर्षाच्या सुरुवातीला जवळपास सात वर्षांनंतर नायर इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत भारतीय संघात परतला होता. मात्र, तो मोठी खेळी करू शकला नाही आणि फक्त एक अर्धशतक झळकावल्यामुळे त्याला पुढील वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाबाहेर करण्यात आले. आता रणजी ट्रॉफीतील या जबरदस्त फॉर्ममुळे निवडकर्त्यांना त्याच्यावर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मालिकेच्या संघात जर कोणता फलंदाज दुखापतीमुळे बाहेर पडला, तर करुण नायर हा त्याचा पर्याय ठरू शकतो.
हे ही वाचा -





















