T20 World Cup 2021: विश्वचषकात शतक झळकावून जोस बटलरची अनेक विक्रमांना गवसणी
T20 World Cup 2021: जोस बटलरने 150.75 च्या स्ट्राइक रेटने 67 बॉलमध्ये नाबाद 101 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक 2021 च्या 29 व्या साखळी सामन्यात (ENG vs SL) इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) श्रीलंकेविरुद्धच्या नाबाद शतक झळकावलंय. त्याने पहिल्या डावातील शेवटच्या बॉलवर षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केलंय. या सामन्यात जोस बटलरने 150.75 च्या स्ट्राइक रेटने 67 बॉलमध्ये नाबाद 101 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. बटलरच्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांत 4 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. यंदाच्या टी-20 विश्वचषकात शतक ठोकणारा बटलर पहिलाच फलंदाज ठरला आहे.
- जोस बटलरने टी-20 विश्वचषकात यष्टिरक्षक म्हणून दुसरी सर्वोच्च खेळी केलीय. टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडचा ब्रेडन मेक्युलमच्या नावावर सर्वाधिक 123 धावा केल्याचा विक्रम आहे.
- जोस बटलरने श्रीलंकेविरुद्ध नाबाद शतकी खेळी करताना सलामीवीर म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. तो इंग्लंडसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 26 इनिंगमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठून अॅलेक्स हेल्सचा विक्रम मोडीत काढला आहे.
- टी-20 क्रिकेटमध्ये जोस बटलर हा इंग्लंडकडून सर्वात वेगवान 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने 78 डावांत हा पराक्रम केलाय. त्याने 83 डावांत शतक ठोकणाऱ्या इऑन मॉर्गनचा विक्रम मोडलाय. याशिवाय, टी-20 विश्वचषकात इंग्लंडकडून शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. बटलरपूर्वी अॅलेक्स हेल्सने टी-20 विश्वचषकात इंग्लंडकडून शतक झळकावलं होतं. टी-20 विश्वचषकात यष्टीरक्षक म्हणून शतक झळकावणारा जोस बटलर हा दुसरा फलंदाज ठरला. याआधी ब्रेंडन मॅक्क्युलमने टी-20 वर्ल्ड कपमध्ये यष्टिरक्षक म्हणून पहिले शतक झळकावले होते.
संबंधित बातम्या-
- India, T20 WC Standings: ...तरीही भारत गाठू शकतो उपांत्य फेरी, जाणून घ्या यामागचे समीकरण
- Kevin Pietersen On Team India: 'खेळाडू रोबोट नाहीत, त्यांना पाठिंब्याची गरज' भारतीय संघाच्या समर्थनार्थ केविन पीटरसनचे हिंदीत ट्विट
- T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या कुटुंबाला धमक्या, पाकिस्तानचा इंझमामही भडकला