T20 World Cup : इंग्लंडला मोठा धक्का, विश्वचषकाआधीच कर्णधार जायबंदी
T20 World Cup : विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्याआधी इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरोधात टी 20 सामन्याची मालिका खेळणार आहे. पण त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.
Jos Buttler Injury : विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्याआधी इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरोधात टी 20 सामन्याची मालिका खेळणार आहे. पण त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला दुखापत झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड-पाकिस्तान टी20 मालिकेत जोस बटलर बेंचवरच बसण्याची शक्यता आहे. पण विश्वचषकापर्यंत जोस बटलर तंदुरुस्त होणार का? हा चाहत्यांना पडला आहे. जर दुखापतीमुळे जोस बटलर विश्वचषकातून बाहेर पडला, तर हा इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जाईल. दरम्यान, जोस बटलर आयपीएलमध्ये राजस्थानचा सदस्य आहे. त्यानं साखळी सामन्यात शानदार कामगिरी केली. प्लेऑफच्या सामन्याआधी तो मायदेशी परतला. आता तो दुखापतग्रस्त झालाय, त्यामुळे इंग्लंडचे टेन्शन वाढलेय. पाकिस्तानविरोधातील टी20 मालिकेत बटलर याला आराम दिला जाऊ शकतो.
पाकिस्तानविरोधात खेळण्याबाबात सस्पेन्स
टी20 विश्वचषकाआधी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये टी20 मालिका होणार आहे. 22 मे 2024 रोजी पहिला सामना होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोस बटलर पहिल्या सामन्याला उपलब्ध नसेल. दुखापतीमुळे त्याला आराम दिला जाणार आहे. त्याशिवाय संपूर्ण टी20 मालिकेत जोस बटलर खेळण्याची शक्यता कमीच आहे. जोस बटलर याच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण विश्वचषकाच्या तयारीसाठी जोस बटलर गेल्या आठवड्यात आयपीएल सोडून मायदेशी परतला होता. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघात जोस बटलर खेळत होता. प्लेऑफच्या सामन्यात तो उपलब्ध नसल्याचा राजस्थानला फटका बसला आहे. आता जोस बटलर दुखापतग्रस्त असल्याचे बोलले जातेय. त्याला आयपीएलदरम्यान दुखापत झाली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इंग्लंड-पाकिस्तान टी20 मालिकेचं वेळापत्रक काय आहे?
टी20 विश्वचषकाआधी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार सामन्याची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला टी20 सामना बुधवार, 22 मे रोजी हेडिंग्ले येथे होणार आहे. त्यानंतर 25 मे रोजी एजबेस्टन येथे हे दोन्ही संघ आमनेसामने असीतल. मालिकेतील तिसरा टी20 सामना 28 मे रोजी कार्डिफ येथे होणार आहे. अखेरचा टी20 सामना 30 मे रोजी लंडन येथे पार पडणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड हे संघ विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. पण जोस बटलरच्या दुखापतीनं इंग्लंडचं टेन्शन वाढले आहे. 2 जून पासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे.