एक्स्प्लोर

Ind vs Eng 4th T20 : 'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?

Jofra Archer-Vaibhav Sooryavanshi : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Jofra Archer-Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 4th T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरला. भारताचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने डावाची चांगली सुरुवात केली होती. त्याने दोन शानदार षटकारही मारले, परंतु तो आपली खेळी मोठी करू शकला नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याला बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता आर्चरने वैभव सूर्यवंशीबाबत एक मोठे वक्तव्य केले असून आगामी सामन्यांसाठी त्याला थेट इशारा दिला आहे.

वैभव आणि जोफ्रा यांच्यातील चुरस

या टी-20 मालिकेत जोफ्रा आर्चर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभवने जोफ्राच्या चेंडूवर एक खणखणीत षटकार ठोकला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने आर्चरचा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. मात्र, आर्चरनेही तितकेच चोख प्रत्युत्तर दिले. त्याने एका भेदक बाउन्सरवर वैभवला बाद केले आणि त्याची 13 धावांची खेळी संपुष्टात आणली.

वैभवला बाद केल्यावर जोफ्रा काय म्हणाला?

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जोफ्रा आर्चरला वैभव सूर्यवंशीला बाद करण्याबाबत विचारण्यात आले. त्यावर आर्चरने स्पष्ट केले की, वैभवची विकेट घेऊन त्याने आधी मारलेल्या दोन षटकारांचा हिशोब चुकता केला आहे. तो म्हणाला की, "मला वाटतं आता आमचा हिशोब बरोबर झाला आहे."

भारत आणि इंग्लंड यांच्यात अजून दोन टी-20 सामने शिल्लक आहेत. जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. आगामी सामन्यांमध्ये जो सरस कामगिरी करेल, तोच बाजी मारेल असे त्याने स्पष्ट केले. आर्चर म्हणाला की, "मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत आणि परिस्थिती कोणत्याही बाजूने बदलू शकते. जो संघ किंवा खेळाडू मैदानात अधिक चांगला खेळ करेल, तोच जिंकेल."

इंग्लंडच्या विजयावर आर्चरची प्रतिक्रिया

इंग्लंडच्या या शानदार विजयावर बोलताना जोफ्रा आर्चरने संघाच्या रणनीतीचे कौतुक केले. तो म्हणाला, "कधीकधी तुम्हाला मैदानावरील आपल्या भावभावनांवर आणि उत्साहावर नियंत्रण ठेवावे लागते. आज आम्ही तेच केले आणि त्याचा सकारात्मक निकाल आमच्या बाजूने लागला."

भारत-इंग्लंड दरम्यान पुढील सामना कधी?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुढील चौथा टी-20 सामना गुरुवार 9 जुलै 2026 रोजी ब्रिस्टल येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल. सध्या इंग्लंडने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा असून, टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून आपले खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

हे ही वाचा -

Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget