आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी दोन मोठ्या क्रिकेट बोर्डाने दिला जय शाह यांना पाठिंबा; लवकरच घोषणा!
Jay Shah ICC: सगळ्यांच्या नजरा आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्याकडे लागल्या आहेत.
Jay Shah ICC: आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ संपत आहे आणि काल ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्याकडे लागल्या आहेत.
ग्रेग बार्कले हे नोव्हेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा या पदावर निवडून आल्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे सूत्रे स्वीकारली होती. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी 6 ते 7 दिवसांत आयसीसीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पाठिंबा-
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने जय शाह (Jay Shah) यांना किमान 3 वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. सध्याचे आयसीसीचे (ICC) अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. काल ग्रेग बार्कले यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी आयसीसीच्या आगामी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे जय शाह यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.
JAY SHAH TO TAKE OVER AS NEW ICC CHAIRMAN...!!! 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 21, 2024
- Australia and England supported Jay Shah to run the ICC for at least 3 years. (The Age). pic.twitter.com/X6rPkCMQ2z
2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सामील-
जय शाहने 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास इतिहास रचणार-
जय शाह वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत, ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास ते या पदावर 3 वर्षे राहतील.
संबंधित बातमी:
एका षटकात 39 धावा ठोकल्या, गोलंदाजाला धू धू धुतला; टी-20 मध्ये नवीन विश्वविक्रम, पाहा Video