'आमचं बाळ तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही', जसप्रीत बुमराहची पत्नी नेटकऱ्यांवर संतापली
Jasprit Bumrah's Wife Sanjana Ganesan Instagram : 'आमचं बाळ तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही', जसप्रीत बुमराहची पत्नी नेटकऱ्यांवर संतापली

Jasprit Bumrah's Wife Sanjana Ganesan Instagram : मुंबई इंडियन्सने रविवारी लखनौविरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मुंबईने लखनौचा 54 धावांनी पराभव केलाय. या सामन्यात जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन तिचा मुलगा अंगदसोबत संघाला सपोर्ट देण्यासाठी आली होती. या सामन्यात जसप्रीत बुमराहने आक्रमक आणि भेदक मारा केलाय. त्याने 4 षटकांत 22 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
एका विकेट दरम्यान, संपूर्ण स्टेडियम बुमराहचे कौतुक करत होता, त्याच वेळी कॅमेरा देखील संजनाकडे गेला. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. काही वापरकर्त्यांनी अंगदच्या हावभावांवर चर्चा सुरू केली, जी संजनाला आवडली नाही आणि तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपला राग व्यक्त केला.
जसप्रीत बुमराहने विकेट घेतली तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या. संजना आणि तिचा मुलगाही टाळ्या वाजवत होते, यादरम्यान कॅमेरा त्यांच्याकडे गेला आणि अंगदच्या चेहऱ्याची झलक दिसली. मग काय झालं, काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक त्यावर चर्चा करू लागले. आता संजना गणेशनने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करून आपला राग व्यक्त केला. संजना गणेशन म्हणाली, आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी नाही.
संजना गणेशन म्हणाली, "आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, कारण इंटरनेट हे एक घृणास्पद आणि घाणेरडे ठिकाण आहे आणि कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात. पण कृपया समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो, दुसरे काही नाही."
आमचा मुलगा इंटरनेटवर व्हायरल होण्यात किंवा राष्ट्रीय बातम्यांमध्ये आणण्यात आम्हाला रस नाही. कारण काही कीबोर्ड योद्धे अनावश्यकपणे 3 सेकंदांच्या फुटेजवरून अंगद कोण आहे, त्याची समस्या काय आहे, त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे ठरवत आहेत, असंही संजना म्हणाली.
पुढे बोलताना संजना गणेशन म्हणाली, तो दीड वर्षाचा आहे. एखाद्या मुलाच्या संदर्भात ट्रॉमा आणि नैराश्य असे शब्द वापरणे म्हणजे आपण एक समुदाय म्हणून काय बनत आहोत याचे प्रतिबिंब आहे आणि ते खरोखरच दुःखद आहे. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही. आजच्या जगात थोडीशी प्रामाणिकता आणि थोडीशी दयाळूपणा खूप मोठी कामगिरी करते."
Angad bumrah reaction to Jasprit bumrah wicket😭😂#MIvsLSG
— 𝐙𝐨𝐫𝐚𝐰𝐚𝐫_𝐁𝐚𝐣𝐰𝐚 (@StoneCold0008) April 27, 2025
pic.twitter.com/GQHRP0HHcC
View this post on Instagram

इतर महत्त्वाच्या बातम्या




















