Jasprit Bumrah : ...तरच गोलंदाजीची संधी मिळणार; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बुमराहपुढे मोठी अग्निपरीक्षा
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, परंतु त्यात अजूनही बदल होऊ शकतात.

Jasprit Bumrah Fitness Update Champions Trophy : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, परंतु त्यात अजूनही बदल होऊ शकतात. खरंतर, आयसीसीने सर्व आठ संघांना 11 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याची अंतिम मुदत दिली आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, बुमराह बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला आहे, जिथे तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह 2-3 दिवस एनसीए तज्ञांच्या निरीक्षणाखाली असेल. संपूर्ण गोष्टी नीट पाहिल्यानंतरच अहवाल अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडे पाठवला जाईल. भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी एक अपडेट समोर आली होती की, बुमराहचा भारतीय संघात समावेश केला जाईल. परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.
गेल्या महिन्यात पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले की, जसप्रीत बुमराहला पाच आठवडे विश्रांती देण्यात आली आहे आणि तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नाही. आगरकर म्हणाले की, बुमराहच्या तंदुरुस्तीचा निर्णय फेब्रुवारी सुरुवातीला घेतला जाईल. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल तपासल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल.
टीम इंडियाकडे फक्त एक आठवडा अजून बाकी
चॅम्पियन्स ट्रॉफी संघात जसप्रीत बुमराहला कायम ठेवायचे की नाही हे ठरवण्यासाठी भारतीय संघाकडे फक्त एक आठवडा बाकी आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत, सर्व आठ संघांना कोणत्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कोणत्याला नाही हे ठरवायचे आहे. दरम्यान, बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळून त्याची मॅच फिटनेस सिद्ध करावी लागेल.
Jasprit Bumrah has reached Bengaluru, he is set to be monitored by BCCI medical team today. [Sahil Malhotra from TOI]
— Johns. (@CricCrazyJohns) February 3, 2025
- Hoping for a positive news this week 🤞 pic.twitter.com/xehLjXfgsL
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
