Video : कार ड्रायव्हरने अचानक दरवाजा उघडला, अन् रस्ते अपघातात क्रिकेटपटूचा मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
आयुष्यात कधी, कुठे, काय घडेल याचा अंदाज कोणालाच नसतो. मृत्यू कधी दार ठोठावून आपल्या प्रियजनांपासून दूर नेईल, हे कुणालाही सांगता येत नाही.

Jammu Kashmir Cricketer Fareed Hussain Road Accident : आयुष्यात कधी, कुठे, काय घडेल याचा अंदाज कोणालाच नसतो. मृत्यू कधी दार ठोठावून आपल्या प्रियजनांपासून दूर नेईल, हे कुणालाही सांगता येत नाही. असंच काहीसं जम्मू-काश्मीरमधील एका तरुण क्रिकेटपटूसोबत घडलं. हा क्रिकेटपटू शांतपणे त्याच्या मार्गावर जात असताना अचानक काहीतरी घडले ज्यामुळे या खेळाडूचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात राहणारा स्थानिक क्रिकेटपटू फरीद हुसैन याचा दुर्दैवी रस्ते अपघातात मृत्यू झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना 20 ऑगस्टची आहे. फरीद रस्त्याने जात असताना दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.
नेमका अपघात कसा घडला?
#Viral Video: A man Fareed Khan, who was a renowned cricketer from Poonch, has lost his life in this incident.#Poonch #RoadAccident #greaterjammu pic.twitter.com/IycMdPQNP1
— Greater jammu (@greater_jammu) August 22, 2025
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की फरीद स्कूटरवरून जात आहे, तो एका कारजवळून पुढे निघत असतानाच कारचालकाने अचानक गाडीचं दार उघडलं. दरवाजा उघडताच फरीदचा स्कूटर तोल गमावून रस्त्याच्या कडेला खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. आसपासच्या लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवता आला नाही. शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे फरीदला आपला जीव गमवावा लागला, ज्याचा मोठा धक्का त्याच्या कुटुंबाला बसणार आहे.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून क्रिकेटविश्वालाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेजमधून संपूर्ण प्रकार उघड झाला आहे.
जम्मू-काश्मीर आणि क्रिकेट
जम्मू-काश्मीर बहुतेक वेळा दहशतवादी हालचालींमुळे चर्चेत येतो, पण इथून अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटूही घडले आहेत. परवेज रसूलने जम्मू-काश्मीरमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर उमरान मलिकसारखा वेगवान गोलंदाज इथून समोर आला. तो बराच काळ दुखापतीमुळे बाहेर होता, मात्र आता पुनरागमनाची तयारी करत आहे. याच ठिकाणाहून अब्दुल समदसारखा दमदार फलंदाज समोर आला आहे, ज्याने आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे.
हे ही वाचा -





















