एक्स्प्लोर

J&K beat Mumbai Ranji Trophy : तीन कॅप्टन, 6 आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरीही मुंबई हरली, रणजी चषकात जम्मू काश्मीरचा दणदणीत विजय

पारस डोग्राच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरने मुंबईचा 5 गडी राखून पराभव केला.

Jammu and Kashmir shock defending champions Mumbai : मुंबई संघात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, कसोटी सलामीवीर यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीत माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेसारखे खेळाडू असतानाही काश्मीर विरुद्ध त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पारस डोग्राच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरने मुंबईचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईसाठी शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावले, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 

मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर पहिल्या डावात शार्दुल ठाकूरच्या 51 धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने 120 धावा केल्या. प्रत्युत्तरात, शुभम खजुरियाच्या 53 धावांच्या खेळीच्या जोरावर जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा केल्या. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरने मुंबईवर 86 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून उमर नझीर आणि युद्धवीर सिंग यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.

यानंतर, दुसऱ्या डावात मुंबई संघाची हालत खराब होती, पण शार्दुल ठाकूरने 119 धावांची शानदार खेळी केली आणि तनुष कोटियनने संघासाठी 62 धावांची महत्वाची इनिंग खेळली. या दोन डावांच्या आधारे मुंबईने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या. मुंबईला 204 धावांची आघाडी मिळाली आणि या संघाने जम्मू-काश्मीरला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल, जम्मू आणि काश्मीरने दुसऱ्या डावात 5 गडी बाद 207 धावा केल्या आणि सामना 5 गडी राखून जिंकला.

दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून मुंबईविरुद्ध युधवीर सिंगने 3 तर आकिब नबीने 4 विकेट घेतल्या. या सामन्याच्या दोन्ही डावात 7 विकेट घेणाऱ्या युद्धवीर सिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. दुसऱ्या डावात मुंबईकडून शम्स मुलानीने 4  तर मोहित अवस्थीने 1 विकेट घेतली.

हे ही वाचा -

Aryan Juyal Double Century : जिथे रोहित शर्मा, ऋषभ पंत, जैस्वाल ठरले फेल; तिथे 23 वर्षाच्या पठ्ठ्याचा धमाका! रणजी ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक अन्...

Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

व्हिडीओ

Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Embed widget