एक्स्प्लोर
Advertisement
James Pattinson Retires: अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, जेम्स पॅटिन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
James Pattinson Retires: जेम्स पॅटिन्सनने 2011 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये 21 कसोटी, 15 एकदिवसीय आणि 4 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
James Pattinson Retires: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने (James Pattinson) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) आज निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये खेळण्यात येणाऱ्या अशेस मालिकेपूर्वी (Ashes 2021) जेम्स पॅटिन्सनने घेतलेला निवृत्तीचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जेम्स पॅटिन्सन 31 वर्षाचा असून त्याने कुटुंबियांना वेळ देण्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी खेळण्यासाठी आणि भविष्यातील वेगवान गोलंदाज तयार करण्यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
जेम्स पॅटिन्सनने 2011 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये 21 कसोटी, 15 एकदिवसीय आणि 4 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पॅटिन्सनने कसोटीत 81, एकदिवसीय सामन्यात 16 आणि टी -20 मध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. या वेगवान गोलंदाजाने आपल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पाच बळी मिळवून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली. त्यानंतर 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजयात त्याने आक्रमक गोलंदाजी केली होती. यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरलेला पॅटिन्सन आगामी अशेस मालिकेत संघात पुनारागमन करेल, अशी क्रिकेट चाहत्यांकडून अपेक्षा केली जात होती. त्याने सप्टेंबर 2015 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. परंतु, त्यानंतर पाठीच्या दुखापतीने त्याला क्रिकेटपासून दूर ठेवले. त्याने 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि त्याच वर्षी अॅशेस मालिका खेळली होती.
जेम्स पॅटिन्सन म्हणाला की, "मला माहित आहे की माझ्याकडे फक्त तीन किंवा चार वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. मग मला असे वाटले की, उच्च स्तरावर खेळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, मी व्हिक्टोरियावर अधिक लक्ष केंद्रित करणे योग्य आहे. ज्याचा युवा खेळाडूंना अधिक फायदा मिळेल. कदाचित इंग्लंडमध्ये काही क्रिकेट असेल आणि माझ्या कुटुंबासह अधिक वेळ घालवेल. पॅटिन्सनने दुखापतीदरम्यान मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाचे आभार मानतो. मला ऑस्ट्रेलियाच्या संघात संधी दिल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद करतो," असे पॅटिन्सनने म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement