IND vs NZ : इशान भावानं मन जिंकलं! विराट कोहलीसाठी फेकली विकेट
IND vs NZ : इंदूरच्या मैदानात भारतानं न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्याच्या मालिकेत 3-0 च्या फराकनं विजय मिळवला.
IND vs NZ : इंदूरच्या मैदानात भारतानं न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्याच्या मालिकेत 3-0 च्या फराकनं विजय मिळवला. टीम इंडियाच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर आटोपला. भारतानं न्यूझीलंडला धूळ चारत आयसीसीच्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान काबिज केले आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी केली. फलंदाजी करताना इशान किशान (Ishan Kishan) यानं केलेल्या एका कृतीमुळे सर्वांची मनं जिंकली आहेत. विराट कोहलीसाठी (Virat Kohli) इशान किशन यानं आपली विकेट फेकली... याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी इशान किशनचं कौतुक करत आहेत.
कसा बाद झाला इशान ? -
35 व्या षटकात विराट कोहली आणि इशान किशन मैदानात होते. जैकब डफी आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकला. या चेंडूला इशान किशन याने कव्हरकडे मारले... त्यानंतर धाव घेण्यासाठी विराटला खुनवलं. इशानचा इशारा पाहताच नॉन स्ट्राइकरला असणारा विराट कोहली धावला... पण त्याचवेळी तिथं असणाऱ्या फिल्डरनं जबरदस्त फिल्डिंग करत चेंडू अडवला..ते पाहताच इशान किशन याने माघारी जाण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत विराट कोहलीही त्याच एण्डला पोहचला होता.. त्यानंतर इशान किशन यानं माघारी न जाताच बाहेर जाणं पसंत केले. त्यानंतर इशान किशन याला पंचांनी बाद दिलं. विराट कोहलीमुळे इशान किशन याने आपली विकेट फेकली. इशानच्या रुपाने भारतीय संघाला तिसरा धक्का बसला होता. इसान किशन याने 24 चेंडूत 17 धावा केल्या. या छोट्या खेळीत इशान किशन याने एक चौकार आणि एक षटकार लगावला होता.
विराट कोहलीसाठी विकेट फेकल्यानंतर इशान किशन यानं सर्वांचं मन जिंकलं.. स्टेडिअममध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून खिलाडूवृत्तीला दाद दिली. सोशल मीडियावरही इशान किशन याच्यावर कौतुकाची थाप पडत आहे. इशान किशनचं अनेकजण कौतुक करत आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) January 24, 2023
न्यूझीलंडला व्हाइट वॉश
तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं न्यूझीलंडचा 3-0 च्या फरकाने पराभव केला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील तिसऱ्या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला. तर हैदराबाद येथे झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला होता. रायपूर येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा आठ गड्यांनी पराभव केला होता.