SMAT 2025 Final: 10 षटकार, 6 चौकार, ईशान किशनचं वादळी शतक अन् पुष्पा स्टाईल सेलीब्रेशन, झारखंडला विजेतेपद मिळवून देत टी 20 वर्ल्ड कपसाठी दावेदारी ठोकली
Ishan Kishan Century, SMAT 2025 Final: झारखंडचा कॅपट्न ईशान किशन यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये वादळी फलंदाजी केली आहे.

पुणे : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडचा कॅप्टन ईशान किशन यानं हरियाणाविरोधात दमदार शतक केलं. झारखंडनं ईशान किशन, कुमार कुशाग्र,अनुकूल रॉय, रॉबिन मिंझ यांच्या दमदार खेळीमुळं 20 ओव्हरमध्ये 3 बाद 262 धावा केल्या. ईशान किशान यानं 49 बॉलमध्ये 206.12 च्या स्ट्राइक रेटनं 101 धावा केल्या. या खेळीत त्यानं 10 षटकार आणि 6 चौकार मारले. 262 धावांचा पाठलाग करताना हरियाणाचा संघ 193 धावा करु शकला. झारखंडनं फायनलमध्ये हरियाणाला 69 धावांनी पराभूत केलं. झारखंडनं पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं आहे. ईशान किशनच्या नेतृत्त्वात त्यांनी हे करुन दाखवलं आहे. ईशान किशननं या कामगिरीसह टी 20 वर्ल्डकपसाठी दावेदारी ठोकली आहे.
Ishan Kishan Century : ईशान किशनचं शतक
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 फायनलमध्ये हरियाणाचा कॅप्टन अंकित कुमारनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंशुल कंबोज यानं पहिल्याच ओव्हरमध्ये झारखंडचा कॅप्टन विराट सिंह याला 2 धावांवर बाद केलं. यानंतर ईशान किशन आणि कुमार कुशाग्र यानं 177 धावांची भागीदारी केली. 15 व्या ओव्हरमध्ये ईशान किशनची विकेट सुमित कुमारनं घेतली.
ईशान किशन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. ईशान किशननं 24 धावांमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. ईशान किशन बाद झाल तेव्हा त्यानं 49 बॉलमध्ये 101 धावा केल्या होत्या. ईशन किशननं षटकार मारत शतक पूर्ण केलं. या ऐतिहासिक खेळीत त्यानं 10 षटकार आणि 6 चौकार मारले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये 500 धावा पूर्ण करणारा ईशान किशन पहिला खेळाडू ठरला आहे. त्यानं 10 डावांमध्ये 517 धावा केल्या आहेत. ज्यात 2 शतक, 2 अर्धशतकांचा समावेश आहे. SMAT मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 113 इतकी आहे. ईशान किशननं त्या धावा त्रिपुरा विरुद्ध केल्या होत्या.
झारखंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 262 धावा केल्या. यामध्ये ईशान किशनच्या 101, कुमार कुशाग्र 81, अनुकूल रॉय 41 धावा, रॉबिन मिंझ यानं 31 धावा केल्या.
झारखंडनं विजेतेपदावर नाव कोरलं
झारखंडनं 262 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर हरियाणाकडून देखील आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, हरियाणाचे फलंदाज बाद होत गेले, त्यामुळं त्यांना परभव स्वीकारावा लागला. आर्श कबीर विवेक रंगा यानं 17 धावा केल्या. राजवर्धन दलाल यानं 53 धावा, निशांत सिंधू 31 धावा आणि समंत जखर यानं 38 धावा करत हरियाणाच्या विजयासाठी संघर्ष केला. हरियाणाचा संघ 20 ओव्हरमध्ये 193 धावांपर्यंत पोहोचू शकला.





















