IRE vs NZ: आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघानं (Ireland Vs New Zealand) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 असा विजय मिळवलाय. या मालिकेतील अखेरचा आणि तिसरा एकदिवसीय सामना डबलिन येथे खेळण्यात आला. या रोमांचक सामन्यात आयर्लंडच्या संघाला फक्त एका धावानं पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं आयर्लंडच्या संघासमोर 50 षटकात 361 धावांचं लक्ष ठेवलं. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघानं न्यूझीलंडला जोरदार टक्कर दिली. मात्र, एका धावानं त्यांना पराभवाला सामोरे जावा लागलं.
न्यूझीलंडचं आयर्लंडसमोर विशाल लक्ष्य
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. त्यांनी पहिल्या विकेट्ससाठी 78 धावांची भागेदारी केली. त्यानंतर फिन अॅलन 33 धावा करून बाद झाला. यानंतर विल यंगही (3 धावा) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. सलामीवीर मार्टिन गप्टिलसह टॉम लॅथम (30 धावा) आणि हेन्री निकोल्स (79 धावा) यांनी डाव पुढं नेला. गप्टिल (115 धावा) शानदार शतक झळकावून बाद झाला. सामन्याच्या अखेरिस ग्लेन फिलिप्स (47 धावा), मायकेल ब्रेसवेल (21 धावा) आणि मिचेल सँटनर (14 धावा) यांच्या झटपट खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 360 धावा केल्या.
आयर्लंडची न्यूझीलंडला कडवी झुंज
न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघानं सात धावांवर त्यांची पहिली विकेट गमावली. अँडी बालबर्नी शून्यावर बाद झाला.त्यानंतर पॉल स्टर्लिंगनं अँडी मॅकब्रेनसोबत 55 धावांची भागीदारी केली. मॅकब्रेननं वयैक्तिक 26 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर पॉल स्टर्लिंग (120 धावा) आणि हॅरी टेक्टर (108 धावा) तडाखेबाज खेळी केली. दोघांनी 179 धावांची भागेदारी करत आयर्लंडच्या विजयाच्या आशा उंचावल्या. मात्र, स्टर्लिंग बाद झाल्यानंतर आयर्लंडनं ठराविक अंतरानं विकेट गमावण्यास सुरुवात केली. या सामन्यातील अखेरच्या षटकात आयर्लंडला 10 धावांची आवश्यकता होती आणि दोन विकेट्स शिल्लक होत्या. आयर्लंडनं पहिल्या पाच चेंडूत सात धावा करत एक विकेट गमावली. त्यानंतर जोस लिटलसा शेवटच्या चेंडूवर तीन धावा काढत्या आल्या नाहीत आणि आयर्लंडला एका धावानं पराभव पत्कारावा लागलाय.
हे देखील वाचा-