Navdeep Saini : भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) खेळणार आहे. याआधीच चार भारतीय या स्पर्धेत खेळत असताना आता आणखी एक युवा गोलंदाज या क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. नवदीप सैनी हा भारताकडून तिन्ही प्रकारच्या फॉर्मेटमध्ये खेळणार आहे. तो भारतात स्थानिक क्रिकेट दिल्लीकडून खेळतो. नवदीप एक चांगल्या दर्जाचा वेगवान गोलंदाज आहे, पण तो खास फॉर्ममध्ये नसल्याने यंदा मात्र तो एकही सामना भारतीय संघासाठी खेळलेला नाही.
पुढील आठवड्यात केंट संघाकडून करु शकतो डेब्यू
नवदीप सैनी (Navdeep Saini) यंदा अखेरचा आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मैदानात दिसला होता. आता तो काऊंटी क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. तो लवकर तो यंदाच्या सीजनमध्ये केंट संघाकजून तीन काऊंटी मॅच खेळणार असून रॉयल लंडन कप टूर्नामेंटमध्ये पाच वनडे सामनेही खेळेल. नवदीप सैनीने केंटसोबत करारावर म्हणाला, 'काऊंटी क्रिकेट खेळनं एक मोठी गोष्ट आहे. यावेळी मी केंट संघासाठी माझं उत्तम प्रदर्शन देऊ इच्छितो.'
सध्या चार भारतीय खेळाडू काऊंटी क्रिकेटमध्ये
सद्यस्थितीला भारताचे चार खेळाडू इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. यावेळी आता नवदीप सैनीच्या स्पर्धेत जाण्याने पाच भारतीय यंदाचा काऊंटी क्रिकेट सीजन खेळत आहेत. याआधी चेतेश्वर पुजारा (ससेक्स), वॉशिंगटन सुंदर (लंकाशायर), क्रुणाल पांड्या (वार्विकशायर) आणि उमेश यादव (मिडलसेक्स) संघाकडून खेळत आहेत. सैनी गेलेल्या केंट संघाला यंदा खास कामगिरी करता आलेली नाही. त्यानी खेळलेल्या 9 सामन्यातील केवळ एकच सामना त्यांनी जिंकला आहे. गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-